पान ४- दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना अटक
By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST
मडगाव : मडगाव पोलिसांनी दुचाकी चोरणार्या आरोपावरून तिघा अल्पवयीन मुलांसह चौघांच्या टोळीला अटक केली. बोर्डा येथील बेंड्रोय बेंजामिन नाईक (२0) व इतर तिघा अल्पवयीन मुलांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांनी कोंबा येथील झेव्हियर बोर्जिस याच्या मालकीची मडगाव-कोंबा येथे उभी केलेली दुचाकी पळविली होती. ही चोरीला गेलेली दुचाकी अटक केलेल्या चोरांकडे सापडली असून मडगावात झालेल्या इतर दुचाकी चोरीच्या घटनांशी या टोळीचा संबंध आहे का? याचा मडगाव पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)