पान 4- 72 वर्षीय इसमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By admin | Updated: August 12, 2015 23:54 IST
आकेत भरदिवसा घटना : संशयिताला अटक
पान 4- 72 वर्षीय इसमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
आकेत भरदिवसा घटना : संशयिताला अटकमडगाव : एका पाच वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मडगाव पोलिसांनी आके येथील शेख महमद (72) व्यावसायिकाला अटक केली. ही घटना बुधवारी (दि. 12) सायंकाळी 5 वा.च्या सुमारास शेख याच्या अल हाउस रेग्झीन्स या दुकानावर झाल्याची माहिती मडगाव पोलिसांकडून मिळाली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, शेख याचे आके येथे मोटरसायकल व सीट कव्हर्सचे दुकान आहे. या दुकानावर बुधवारी सायंकाळी एक महिला आपल्या पाच वर्षीय मुलीला घेऊन स्कुटरला सीट कव्हर घालण्यासाठी आली होती. या वेळी शेख याने त्या पाच वर्षीय मुलीला आपल्या दुकानात आत नेले आणि तिचा विनयभंग केला, असा आरोप आहे.संशयित हा 72 वर्षीय असल्याने त्या मुलीच्या आईला त्याच्याबद्दल कुठलाही संशय आला नव्हता. मात्र, काही वेळाने त्या मुलीचे वडील त्या दुकानात पोहोचले. त्यानंतर मुलीला घेऊन दुकानदार आत काय करतो, हे पाहण्यासाठी ते आतमध्ये गेले असता आरोपी त्या मुलीशी विकृत चाळे करत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर पोलीस तक्रार करून संशयिताला अटक करण्यात आले. (प्रतिनिधी)ढँ3 : 1208-टअफ-19कॅप्शन: मडगाव पोलीस स्थानकात अटक करून आणलेला आरोपी शेख महमद. (छाया: पिनाक कल्लोळी)