पान ३ : साखळी शिगमोत्सव समिती कार्याध्यक्षपदी देसाई
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
साखळी : पर्यटन खाते व साखळी शिगमोत्सव समितीच्या सहकार्याने साखळीत १२ मार्च रोजी साजरा होणार्या शासकीय पातळीवरील शिगमोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. सरोज देसाई यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी दिगंबर उसपकर यांची निवड केली आहे.
पान ३ : साखळी शिगमोत्सव समिती कार्याध्यक्षपदी देसाई
साखळी : पर्यटन खाते व साखळी शिगमोत्सव समितीच्या सहकार्याने साखळीत १२ मार्च रोजी साजरा होणार्या शासकीय पातळीवरील शिगमोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. सरोज देसाई यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी दिगंबर उसपकर यांची निवड केली आहे.उर्वरित समिती पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष- दयेश नाईक, शिवानंद पेडणेकर, कालिदास गावस, किशोर वळवईकर, सुभाष फोंडेकर, सचिव- सिद्धी प्रभू, खजिनदार- दत्ताराम चिमुलकर, सहखजिनदार- श्याम पेडणेकर, चित्ररथ प्रमुख- अमोल बेतकेकर, धीरज पेडणेकर, रोमटामेळ प्रमुख- शिरीष भणगे, लोकनृत्य प्रमुख- प्रा. गजानन देसाई, आनंद काणेकर, वेशभूषा प्रमुख- शीतल बोडके. कार्यक्रम प्रमुख- प्रवीण ब्लेगन व राधिका सातोस्कर, अल्पोपहार प्रमुख- सुविधा पेडणेकर, गोपाळ सुर्लकर, सजावट प्रमुख- सर्वेश नार्वेकर, प्रसिद्धी प्रमुख- संतोष मळीक, चंद्रशेखर देसाई, सिद्धार्थ मळीक, सुदेश बायेकर, राजेश वझरीकर, निधी प्रमुख- राजू शेटये, सल्लागर प्रमुख- भीमराव देसाई, अशोक देसाई, पांडुरंग गोवेकर व यशवंत वाडकर, स्वयंसेवक प्रमुख- उमेश सरनाईक, वाहतूक व्यवस्था प्रमुख- दशरथ मळीक, आतषबाजी प्रमुख- विनय पांगम, आयोजन समिती प्रमुख- प्रा. अनिल वेर्णेकर, स्वागत कक्ष प्रमुख- सत्यवान नाईक. अधिक माहितीसाठी सचिव सिद्धी प्रभू यांच्याकडे संपर्क साधावा.