पान ३ : लवकरच कोकण रेल्वे मार्गावर धावणार डेम्यू ट्रेन
By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST
मडगाव : पेडणे ते काणकोणदरम्यान लवकरच डेम्यू रेल्वे धावणार आहे. कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ ते ६ आठवड्यांच्या आत ही रेलसेवा सुरू होणार आहे. डिझेल व इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिटवर धावणारी ही रेल्वे आहे. प्रारंभी गोव्यातील सर्व कोकण रेल्वे स्थानकाला जोडणार्या दोन डेम्यू रेल्वे धावणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाने दिली आहे.
पान ३ : लवकरच कोकण रेल्वे मार्गावर धावणार डेम्यू ट्रेन
मडगाव : पेडणे ते काणकोणदरम्यान लवकरच डेम्यू रेल्वे धावणार आहे. कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ ते ६ आठवड्यांच्या आत ही रेलसेवा सुरू होणार आहे. डिझेल व इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिटवर धावणारी ही रेल्वे आहे. प्रारंभी गोव्यातील सर्व कोकण रेल्वे स्थानकाला जोडणार्या दोन डेम्यू रेल्वे धावणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाने दिली आहे.गोव्यातील रेलमार्गाचे द्रुपदीकरण करणे व उपनगरीय भागाप्रमाणे कोकण रेल्वेमार्गातील सर्व स्थानकांतून निघणारी रेलसेवा सुरू करणे, ही मुख्यमंत्र्यांची मागणी होती. एक किंवा दोन अशा प्रकारची डेम्यू रेलसेवा सुरू करावी यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील होते. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही डेम्यू रेलसेवेला पसंती दिली होती. कोकण रेल्वेला रेलमंत्र्यांनी अशी रेलसेवा सुरू करता येईल का, याचा अभ्यास करून त्यावर त्वरित तोडगा काढण्यास सुचविले होते, अशी माहिती कोकण रेल्वेने प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.या डेम्यू रेल्वेसाठी वेळापत्रकाबद्दल सध्या विचारविनिमय चालू आहे. वेळेबाबत निर्णय झाल्यानंतर या मार्गावरून डेम्यू रेल्वे धावतील. लवकरच तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. (प्रतिनिधी)