पान 3 : सी.ई.एस. महाविद्यालयात संस्कृत संभाषण शिबिर
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
पणजी : कुंकळ्ळीच्या सी.ई.एस. महाविद्यालयात 10 दिवसाचे संस्कृत संभाषण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराच्या समारोप सोहळ्याला हेडगेवार हायस्कूल पणजी येथील संस्कृत शिक्षक आत्माराम ऊर्फ प्रसाद उमर्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर संस्कृत शिक्षिका वैदेही आमशेकर व रोहन देसाई खास निमंत्रित पाहुणे म्हणून तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सविता नाडकर्णी, प्रा. आनंद देसाई, प्रा. नित्यानंद नायक व प्रा. विनोद काणकोणकर हे उपस्थित होते.
पान 3 : सी.ई.एस. महाविद्यालयात संस्कृत संभाषण शिबिर
पणजी : कुंकळ्ळीच्या सी.ई.एस. महाविद्यालयात 10 दिवसाचे संस्कृत संभाषण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराच्या समारोप सोहळ्याला हेडगेवार हायस्कूल पणजी येथील संस्कृत शिक्षक आत्माराम ऊर्फ प्रसाद उमर्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर संस्कृत शिक्षिका वैदेही आमशेकर व रोहन देसाई खास निमंत्रित पाहुणे म्हणून तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सविता नाडकर्णी, प्रा. आनंद देसाई, प्रा. नित्यानंद नायक व प्रा. विनोद काणकोणकर हे उपस्थित होते.संस्कृत ही आद्य भाषा आहे. भारतीय भाषांची ती जननी आहे. आज जगात सगळीकडे संस्कृत भाषेचा प्रचार होत आहे, तेव्हा प्रत्येक भारतीयाने ही भाषा आत्मसात करावी, असे आवाहन उमर्ये यांनी केले. दहा दिवसांच्या या संस्कृत संभाषण शिबिराला महाविद्यालयातील आणि परिसरातील इतर उच्च माध्यमिक विद्यालयांच्या 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या शिबिरासंदर्भात दीक्षा देसाई, मल्लिका काणकोणकर व विमल फळदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. सविता नाडकर्णी यांनी स्वागत केले. आनंद देसाई यांनी आभार मानले. सूत्रसंचालन राही देसाई यांनी केले.