पान २ : कोकण रेल्वे वाहतूक पूर्ववत
By admin | Updated: May 5, 2015 01:20 IST
मडगाव : सारझोरा येथे बोगद्यात घसरलेले दुरोंतो एक्सप्रेसचे डबे रुळावरून काढल्याने रविवारी उत्तरारात्री दोन वाजल्यापासून या मार्गावरील रेलवाहतूक पूर्ववत सुरू झाली. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. रविवारी सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनसहून एर्नाकुलमकडे जाणार्या दुरोंतो एक्सप्रेसचे १0 डबे सारझोरा येथील बोगद्यात रुळावरून घसरले होते. सुदैवाने यात प्रवाशांना कोणतीही इजा पोहचली नव्हती.
पान २ : कोकण रेल्वे वाहतूक पूर्ववत
मडगाव : सारझोरा येथे बोगद्यात घसरलेले दुरोंतो एक्सप्रेसचे डबे रुळावरून काढल्याने रविवारी उत्तरारात्री दोन वाजल्यापासून या मार्गावरील रेलवाहतूक पूर्ववत सुरू झाली. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. रविवारी सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनसहून एर्नाकुलमकडे जाणार्या दुरोंतो एक्सप्रेसचे १0 डबे सारझोरा येथील बोगद्यात रुळावरून घसरले होते. सुदैवाने यात प्रवाशांना कोणतीही इजा पोहचली नव्हती.अपघात घडल्यानंतर रेल्वे कर्मचार्यांनी रुळावरून घसरलेले डबे काढण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले होते. रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत आठ डबे रुळावरून हटविण्यात त्यांना यश मिळाले होते. मागाहून अन्य दोन डबे रुळावरून काढल्यानंतर रेलमार्गाची दुरुस्ती करून चाचणी केल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. (प्रतिनिधी)