शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पान २ : निधी आहे, पण परवाने नाहीत! - दीनदयाळ पंचायत राज पायाभूत सुविधा योजनेखाली केवळ तीन ठिकाणीच कामे

By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST

पणजी : ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दीनदयाळ पंचायत राज इन्फ्रास्ट्रक्चर योजनेखाली दिला जाणारा निधी एक कोटी रुपयांवरुन वाढवून दीड कोटी रुपये करण्यात आला खरा, परंतु प्रत्यक्षात केवळ तीनच पंचायतींमध्ये कामे सुरु झालेली आहेत. बांधकामांना नगर नियोजन तसेच अन्य खात्यांचे आवश्यक ते परवाने मिळण्यात विलंब होत आहे. वेगवेगळ्या ६३ पंचायतींचे अर्ज खात्याकडे मंजुरीसाठी आहेत.

पणजी : ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दीनदयाळ पंचायत राज इन्फ्रास्ट्रक्चर योजनेखाली दिला जाणारा निधी एक कोटी रुपयांवरुन वाढवून दीड कोटी रुपये करण्यात आला खरा, परंतु प्रत्यक्षात केवळ तीनच पंचायतींमध्ये कामे सुरु झालेली आहेत. बांधकामांना नगर नियोजन तसेच अन्य खात्यांचे आवश्यक ते परवाने मिळण्यात विलंब होत आहे. वेगवेगळ्या ६३ पंचायतींचे अर्ज खात्याकडे मंजुरीसाठी आहेत.
ग्रामपंचायतींना समाजसभागृह, स्वत:च्या कार्यालयासाठी इमारत, शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा भविष्यात उत्पन्नाचे साधन होईल असा अन्य व्यावसायिक प्रकल्प उभारण्यासाठी हा निधी दिला जातो. पंचायती उत्पन्नाच्या बाबतीत आपल्या पायावर उभ्या रहाव्यात आणि स्वावलंबी बनाव्यात या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र तुयें, मांद्रे आणि केरी-तेरेखोल या तीन पंचायतींमध्येच कामे सुरु झालेली आहेत, अशी माहिती मिळाली. या तिन्ही पंचायती माजी पंचायतमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मतदारसंघातील आहेत.
१ कोटी रुपयांपासून १ कोटी २८ लाख रुपयांपर्यंत निधी या पंचायतींना मंजूर झालेला आहे.
.............
६३ पंचायतींचे प्रस्ताव
पंचायत संचालक गुरुदास पिळर्णकर यांना याबाबत विचारले असता १४ पंचायतींच्या प्रस्तावावर प्रकल्पांच्या अंदाजित खर्चाचा अभ्यास चालू आहे. १९0 पंचायतींपैकी आतापर्यंत या योजनेखाली निधीसाठी ६३ अर्ज आले आहेत. ३१ पंचायतींच्या प्रस्तावांवर कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झालेले आहेत, असे त्यांनी सांगितले. या आर्थिक वर्षात ३0 कोटी रुपयांची अंदाजपत्रकी तरतूद असून या पैशातच वावरावे लागणार आहे त्यामुळे दीड कोटीच्या हिशोबाने या वर्षी २0 पंचायतींना हा निधी देण्यात येईल.
............
- २0१२ साली भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेच ही योजना सुरु करण्यात आली. सुरवातीला १ कोटी रुपये निधीची तरतूद होती परंतु पंचायत घर किंवा समाज सभागृहासाठी सादर केले जाणारे प्रस्ताव १ कोटीपेक्षा जास्त खर्चाचे असायचे त्यामुळे साहजिकच निधी मंजूर करण्याच्या बाबतीत अडचण येत असे. हा निधी वाढवून द्यावा, अशी मागणी सर्वच पंचायतींची मागणी होती. (प्रतिनिधी)