कुठ्ठाळी येथे चोरीसाडेतेरा लाखांचे दागिन लंपासवास्को : घरात कोणीच नसल्याचे हेरून अज्ञात चोरट्यांनी कुठ्ठाळी येथे घरातील कपाटात असलेले सुमारे साडेतेरा लाखाचे दागिने लंपास केले. वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुठ्ठाळी येथील नारायण काशीनाथ नाईक हे कुटुंबासमवेत लग्नाच्या खरेदीसाठी बेळगावला गेले होते. घराच्या मुख्य दरवाजाला असलेले टाळे पाहून तसेच घरात कोणीच नसल्याचा अंदाज घेऊन टाळे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. खोलीतील कपाटे फोडून त्यातील चार बांगड्या, दोन सोनसाखळ्या, डायमंडची अंगठी, कर्णफुले असा सुमारे साडेतेरा लाखाचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी भादंसं ४५४,३८० अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक धर्मेश कर्पे पुढील तपास करीत आहे. (प्रतिनिधी)
पान २- कुठ्ठाळी येथे चोरी
By admin | Updated: June 13, 2014 06:57 IST