पान 2 : खाण अवलंबितांसाठी ओटीएस आणखी तीन महिन्यांनी वाढवली
By admin | Updated: September 4, 2015 23:12 IST
पणजी : खाण अवलंबित ट्रकमालक, बार्जवाले यांच्यासाठी असलेली एकरकमी कर्जफेड योजना सरकारने आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. तूर्त 750 हून अधिक अर्ज पडून असल्याची माहिती मिळते.
पान 2 : खाण अवलंबितांसाठी ओटीएस आणखी तीन महिन्यांनी वाढवली
पणजी : खाण अवलंबित ट्रकमालक, बार्जवाले यांच्यासाठी असलेली एकरकमी कर्जफेड योजना सरकारने आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. तूर्त 750 हून अधिक अर्ज पडून असल्याची माहिती मिळते. आतापर्यंत 1883 अर्ज मंजूर होऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. खाणी सुरू होण्यास अजून काही कालावधी जाईल त्यामुळे अवलंबितांना बँकांची कर्जे फेडण्यासाठी आणखी मुदत द्यावी, अशी मागणी होती. दरम्यान, खाणबंदीमुळे बेकार झालेल्या ट्रकचालकांनाही आर्थिक पॅकेज दिले जावे, अशी मागणी होत आहे. चतुर्थीपूर्वी अडीच लाख रुपये आणि नंतर उर्वरित अडीच लाख मिळून पाच लाख रुपये तरी दिले जावेत, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)