शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पान २ : मस्ट : सर्व शिक्षा अभियान प्रकल्प संचालकपदी अनिल पवार यांची अन्याय्य नियुक्ती

By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST

- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशांना हरताळ

- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशांना हरताळ

पणजी : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व शिक्षा अभियान प्रकल्प संचालकपदी आयएएस किंवा राज्य नागरी सेवेतील अधिकारी असणे आवश्यक असताना सरकारने निवृत्त शिक्षण संचालक अनिल पवार यांची या पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती राजकीय वशिलेबाजीने केल्याचे मानले जातेे.
याआधीही असेच प्रकार घडल्याने फेब्रुवारीत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी बैठकीत राज्य सरकारच्या अधिकार्‍यांना वरील मार्गदर्शक तत्त्वांची स्पष्ट शब्दात आठवण करून दिली होती. त्या वेळी नियुक्तीचे प्रकरण सरकारकडे पाठवले आहे, असे गोव्यातून गेलेल्या अधिकार्‍यांनी सांगून वेळ मारून नेली होती. त्यानंतर अवघ्या चार महिन्यंतच या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ फासून पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
१0 जून रोजी काढलेल्या अधिसूचनेत पवार यांच्या सेवाशर्ती तसेच वेतन व अन्य गोष्टी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरणार असेही म्हटले आहे. पवार हे भाजप सरकारला निकट असल्याचे सुरुवातीपासून मानले जाते. शिक्षण खात्यात असताना त्यांना बढतीसाठी अतिरिक्त संचालकपद निर्माण करण्यात आले तसेच नंतर त्यांना संचालकपदी नेमून निवृत्त झाल्यावर सेवावाढही देण्यात आली. यामुळे त्या वेळी खात्यातील अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांवरही अन्याय झाला होता.
दोन वर्षे मुदतवाढीनंतर पवार यांचे सध्याचे वय ६२ वर्षे आहे. सर्व शिक्षा अभियान प्रकल्प संचालकपदावरील व्यक्ती ६५ वर्षांनंतर त्या पदावर ठेवता येत नाही, त्यामुळे तीन वर्षांतच या पदासाठी सरकारला नवी व्यक्ती शोधावी लागणार आहे. या पदावर नेमण्यासाठी आयएएस किंवा नागरी सेवेतील अन्य अधिकारी उपलब्ध असूनही त्याकडे दुर्लक्ष करून पवार यांची सोय केल्याने शिक्षण क्षेत्रात हा चर्चेचा विषय बनला आहे. (प्रतिनिधी)