शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पान 2 : महत्वाची बातमी आजच येणे आवश्यक

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

कोलव्यातील अमेरकर यांचे

कोलव्यातील अमेरकर यांचे
बांधकाम पाडण्याचा आदेश कायम
हरित लवादाकडून शिक्कामोर्तब : 20 लाखांचा दंडही ठोठावला
मडगाव : कोलवा येथील शेतजमिनीत भरती नियंत्रण रेषा कायद्याचे उल्लंघन करून उभारण्यात आलेले अमेरकर यांचे व्यावसायिक बांधकाम पाडण्यासंदर्भात गोवा भरती नियंत्रण प्राधिकरणाने दिलेला आदेश राष्ट्रीय हरित लवादाने कायम केला असून या आदेशाच्या विरोधात अमेरकर यांनी दाखल केलेला आव्हान अर्ज 20 लाखांचा दंड ठोठावत निकालात काढला.
गुरुदास अमेरकर व अनामिका अमेरकर या दोघांनी भरती नियंत्रण रेषा प्राधिकरणाच्या आदेशाला हरित लवादाकडे आव्हान दिले होते. या लवादाचे अध्यक्ष व्ही. आर. किरणगावकर व डॉ. अजय देशपांडे यांच्या द्विसदस्यीय पिठाने 1 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निकालात हा आव्हान अर्ज फेटाळून लावताना 20 लाखांचा दंडही अमेरकर यांना ठोठावला. ही रक्कम चार आठवड्यांत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावी आणि या रकमेचा पर्यावरण संवर्धनासाठी वापर करण्यात यावा, असे या आदेशात म्हटले आहे. या दंडातील 2 लाखांची रक्कम याचिकादार ज्युडित आल्मेदा यांना दाव्याच्या खर्चापोटी देण्यात यावी, असेही म्हटले आहे.
कोलवा येथील शेतजमिनीत अमेरकर दाम्पत्याने रेस्टॉरंट उभारल्यामुळे कोलवा सिव्हिक फोरमच्या आल्मेदा यांनी हे बांधकाम भरती रेषेपासून 200 ते 500 मीटर अंतरात असल्याचा दावा करून भरती नियंत्रण रेषा प्राधिकरणाकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर हे बांधकाम पाडण्याचा आदेश प्राधिकरणाने दिला होता. या आदेशाला लवादासमोर आव्हान देताना अमेरकर कुटुंबाने आपण मच्छीमार असल्याने या बांधकामाला अभय देण्यात यावे, असा दावा केला होता. मात्र, अमेरकर हे कधीच मच्छीमारी व्यवसायात नव्हते, असा निष्कर्ष काढून लवादाने हा दावा फेटाळून लावला. (प्रतिनिधी)