शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

पान 2 : नायजेरियन नागरिकांना आठ दिवसांत हाकला

By admin | Updated: September 6, 2015 23:54 IST

पालये ग्रामसभेत मागणी : घरमालकांना भेटण्याचा निर्णय, युवकांचा आंदोलनाचा इशारा

पालये ग्रामसभेत मागणी : घरमालकांना भेटण्याचा निर्णय, युवकांचा आंदोलनाचा इशारा

मांद्रे : पालये (पेडणे) पंचायतीच्या रविवारी झालेल्या खास ग्रामसभेत ग्रामस्थांनी नायजेरियन युवकांपासून उपद्रव होत असल्याबद्दलचा जाब पंचायतीला विचारला. नायजेरियनांच्या येथील वास्तव्यावर कोणताच परिणाम होत नसल्याने व पंचायतीने केलेल्या पत्रव्यवहाराला यश येत नसल्याने येथील युवकांनी संताप व्यक्त केला. नायजेरियनांपासून गावाला धोका असल्याने आठ दिवसांच्या आत घरे खाली करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
पेडणे व्हिलेजीस डेव्हलपमेंट (पेडणे विकास) समितीच्या बॅनरखाली एकत्र येऊन पंचायत मंडळ व ग्रामस्थांना सोबत घेऊन नायजेरियन भाडेकरू म्हणून राहात असलेल्या निवासस्थानी धडक देऊन संबंधित घरमालकांना भेटून नायजेरियन भाडेकरूंना घर खाली करण्यास भाग पाडावे, अशा सूचना केल्या. तसेच पालये गावात एकाही नायजेरियन नागरिकाला यापुढे थारा न देण्याचा पवित्रा येथील युवावर्गाने घेतला आहे. या दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन परब यांनी अशा जटिल व गावाच्या हिताआड येणार्‍या गोष्टींसाठी आपण खंबीरपणे युवकांच्या लढय़ास पाठिंबा देऊन त्यांचे नेतृत्व स्वीकारीन याची ग्वाही दिली.
नायजेरियन नागरिकांचे बेकायदा वास्तव्य, अमली पदार्थांचा व्यवहार, खुनशी प्रवृत्ती, येथील युवकांच्या अंगावर धावून येणे, धमक्या देणे या प्रकारांत वाढ झाली असल्याने हे गैरप्रकार इथपर्यंतच थांबणे गावाच्या दृष्टीने हिताचे आहे. गावाची सुरक्षितता म्हणून पंचायतीने या विषयाकडे गांभीर्याने पाहून कोणते नियोजन आखले आहे? असा प्रश्न सचिन परब यांनी पंचायत मंडळाला केला. यापूर्वी झालेल्या ग्रामसभेतील मागणीनुसार, नायजेरियन नागरिक वास्तव्यास असलेल्या संबंधित घरमालकांना पंचायतीने कायदेशीर नोटिसा काढल्या. त्याप्रमाणे काहींनी त्यांना घर खाली करण्यास सांगू, असे आश्वासन दिले. मात्र, याची कोणीच दखल घेतली नसल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले.
नायजेरियनांपासून गावाला धोका असल्याने आठ दिवसांच्या आत घरे खाली करण्याची विनंती केली. या वेळी काही घरमालक भेटले तर काही भेटले नाहीत. पालयेतील तिघांच्या घरात नायजेरियन भाडेकरू म्हणून राहात आहेत. संबंधितांनी सूचना मान्य केल्या.

फोटो ओळी-
पालये (पेडणे) पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देताना (((((((((((((सरपंच रवींद्र परब.)))))))))))))) बाजूस उपसरपंच सुप्रिया गावडे, सचिव विलास कुंकळ्ळकर, पंच बाबली आरोलकर व प्रसाद परब.

पालये (पेडणे) ग्रामसभेनंतर नायजेरियन नागरिकांना भाडेकरू म्हणून ठेवूनये हे घरमालकाला पटवून देताना सचिन परब, ((((((((((((((((((सरपंच गोपाळ परब))))))))))))))) व ग्रामस्थ. (छाया : लक्ष्मण ओटवणेकर)


चौकट-
इथेच नायजेरियनांच्या उपद्रवाची ठिणगी पडली
तीन दिवसांपूर्वी येथील युवक साईश परब रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्या बाजूने आडदांड शरीरयष्टीचा नायजेरियन दुचाकीने जात असता साईशची नजर त्याच्यावर पडली. मात्र, तो नायजेरियन परतला व साईशच्या अंगावर धावून आला व खेकसला. त्यानंतर फोन करून त्याने आपल्या आणखी चार मित्रांना बोलावले. यानंतर आपण तेथून पळ काढल्याचे साईशने सांगितले.