पान १- स्मार्ट सिटी - जोड
By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST
स्मार्ट सिटी निवडीत पक्षीय भेदाभेद
पान १- स्मार्ट सिटी - जोड
स्मार्ट सिटी निवडीत पक्षीय भेदाभेदस्मार्ट सिटी योजनेत शहरांची निवड करताना पक्षीय भेदाभेद करण्यात आला आहे. भाजपा-सेना, मनसे व त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असलेल्या महापालिकांची स्मार्ट सिटी योजनेत निवड करताना निकषात बसणार्या काँग्रेस महापालिका मात्र डावलल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथे केला.मराठवाड्यात केवळ औरंगाबाद महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात नांदेडही स्पर्धेत परिपूर्ण उतरले होते. पवित्र स्थान असलेले नांदेडचा गुरुद्वारा प्रसिद्ध असून गुरु-ता-गद्दीच्या काळातही मोठ्या योजना येथील महापालिकेने राबविल्या आहेत. मात्र केवळ काँग्रेसची संपूर्ण सत्ता असल्याकारणाने नांदेडला डावलले, असा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)