शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

(पान -१- मतदान) (सुधारित)

By admin | Updated: May 12, 2014 22:59 IST

सोळाव्या लोकसभेसाठी विक्रमी मतदान

सोळाव्या लोकसभेसाठी विक्रमी मतदान

शेवटच्या टप्प्यातही उत्साह : प. बंगाल-८० टक्के, उ.प्रदेश-५६ टक्के, बिहार-५४ टक्के

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम आणि नवव्या टप्प्यात तीन राज्यांमधील ४१ जागांसाठी आज (सोमवार) आधीच्या टप्प्यांप्रमाणेच भरघोस मतदान झाले. त्यामुळे सोळाव्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची सरासरी स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८४ च्या निवडणुकीतील विक्रमी टक्केवारीपेक्षा (६४.०१) सरस ठरली. यंदा संपूर्ण देशात सरासरी ६६.३८ टक्के मतदारांनी आपला कौल दिला.
आजच्या टप्प्यात प. बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के, उत्तर प्रदेशात ५६, तर बिहारमध्ये ५४ टक्के मतदान झाले. प. बंगालमधील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. उत्तर प्रदेशात वाराणसीतील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, तेथे ५५.३४ टक्के मतदान झाले. २००९ मध्ये तेथे ४३.३४ टक्के मतदान झाले होते. बिहारमधील सहा, प. बंगालमधील १७, तर उत्तर प्रदेशातील १८ जागांवर अखेरच्या टप्प्यात किरकोळ अपवाद वगळता सुरळीत मतदान झाल्याचे उपनिवडणूक आयुक्त विनोद जुत्शी यांनी सांगितले. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सरासरी ५८़ १९ टक्के मतदान झाले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)