शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्तासाठी ७४५ कोटींचे पॅकेज

By admin | Updated: October 23, 2014 19:38 IST

श्रीनगरमधील पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू - काश्मीरमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांसाठी ७४५ कोटी रूपयांचे पॅकेज जाहिर केेले.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. २३ - 
श्रीनगरमधील पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू - काश्मीरमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांसाठी ७४० कोटी रूपयांचे पॅकेज जाहिर केेले. हॉस्पिटलसाठी १७५ कोटी तर घरांच्या बांधणीसाठी ५७० कोटी रूपये केंद्र सरकार उपलब्ध करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्तांना ख-या अर्थाने मोदी यांनी दिवाळी भेट दिली आहे. जम्मू-काश्मिरमधील शिक्षण घेत असलेल्या मुली-मुलांना वह्या-पुस्तके उपलब्ध करण्यात येतील अशी माहितीही मोदी यांनी दिली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दूल्ला यांची भेट घेतली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मिर दौ-यावर काँग्रेसने टीका केली असून हा सर्व पब्लिस्टंट असल्याचे काँग्रसेने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सियाचीनमधील जवानांचीही भेट घेतली. भारतातील प्रत्येक नागरिक तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत आहे असे आश्वासनही मोदींनी या जवानांना  दिले. 
दिवाळीनिमित्त श्रीनगरमध्ये आलेल्या मोदींनी गुरुवारी सकाळी सियाचीनमधील जवानांसोबत काही क्षण घालवला. बिकट स्थितीतही देशाची रक्षा करणा-या या जवानांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, केवढीही उंची असो किंवी थंडी, आमच्या जवानांना कोणीच रोखू शकत नाही. ते जिथे उभं राहून भारताची सेवा करतात त्याचा प्रत्येकाला गौरव वाटतो. जवानांशी संवाद साधल्यावर मोदी पूरग्रस्तांना भेटण्यासाठी श्रीनगरमध्ये जाणार आहेत. श्रीनगरमध्ये नॅशनल क़ॉन्फरन्स, पीडीपी या पक्षांचे शिष्टमंडळही त्यांची भेट घेणार आहे.
  या दौ-यासाठी रवाना होण्यापूर्वी मोदींनी ट्विटरद्वारे त्यांच्या भावना मांडल्या. सियाचीनमध्ये कार्यरत असलेल्या शूरवीर जवानांसोबत वेळ घालवणे ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी म्हटले होते.