शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यातून पाच लाखाची बॅग लांबविणारा गुमाने जाळ्यात

By admin | Updated: November 22, 2015 00:41 IST

जळगाव: सटाणा येथून अण्णा काशिराम सोनवणे यांची पाच लाख रुपये रोकड असलेली बॅग लांबविणारा मंगल दिवान गुमाने (रा.जाखनी नगर, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. दरम्यान, त्याला लागलीच सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यातील दुसरा आरोपी गोपाल संजू नेतलेकर हा अद्याप फरारच आहे.

जळगाव: सटाणा येथून अण्णा काशिराम सोनवणे यांची पाच लाख रुपये रोकड असलेली बॅग लांबविणारा मंगल दिवान गुमाने (रा.जाखनी नगर, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. दरम्यान, त्याला लागलीच सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यातील दुसरा आरोपी गोपाल संजू नेतलेकर हा अद्याप फरारच आहे.
या गुन्‘ात सहभाग असलेल्या विकास उर्फ हाड्या राजू गुमाने व गोपाल उर्फ सन्नाटा दशरथ माचले (दोन्ही रा.कंजरवाडा, जळगाव) या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेने पकडून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांपैकी चार लाख ३० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली होती. या आरोपींच्या शोधासाठी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार नारायण सोनवणे, हेडकॉन्स्टेबल बापुराव भोसले, संजय पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील,मिनल साकळीकर आदींच्या पथकाने जळगाव, भुसावळ, नंदुरबार, धुळे व अमळनेर येथे शोध घेतला. यातील मंगल दिवाने हा जाखनी नगरात रात्री घरी येत असल्याची गुप्त माहिती शरद भालेराव व बापुराव भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, या गुन्‘ात वापरण्यात आलेली दुचाकी याआधीच जप्त करण्यात आली आहे.
इन्फो
सोरट जुगार चालविणार्‍या चौघांना अटक
सहायक निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार नरुद्दीन शेख, भास्कर पाटील, शशिकांत पाटील, विनयकुमार देसले, मिलिंद सोनवणे, संजय मुरलीधर पाटील व विनोद चौधरी आदींच्या पथकाने साळवा ता.धरणगाव येथे सोरट जुगारावर धाड टाकली. त्यात ईश्वर कौतिक बाविस्कर, दत्तू धोंडू पाटील, कैलास खबालाल जोशी व दीपक भील या चौघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सोरटचे साहित्य व १२४० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघांवर धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.