शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पचौरींविरुद्धचे आरोपपत्र तयार

By admin | Updated: February 16, 2016 03:15 IST

दिल्ली पोलिसांनी वर्षभराच्या तपासानंतर तयार केलेल्या आरोपपत्रात हवामान तज्ज्ञ आर. के. पचौरी यांना महिलेचा शीलभंग, लैंगिक अत्याचार आणि धमकावण्याच्या आरोपात दोषी ठरविले आहे.

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी वर्षभराच्या तपासानंतर तयार केलेल्या आरोपपत्रात हवामान तज्ज्ञ आर. के. पचौरी यांना महिलेचा शीलभंग, लैंगिक अत्याचार आणि धमकावण्याच्या आरोपात दोषी ठरविले आहे. साक्षीदारांचा जाबजबाब आणि फोनवरील संभाषणाची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी पचौरी यांना दोषी ठरविले आहे.५०० पानांचे हे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्याआधी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे त्याची नीट छाननी केली जात आहे. पचौरी यांनी दि एनर्जी अ‍ॅण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचे (टेरी) महासंचालक म्हणून ‘आपल्या पदाचा दुरुपयोग’ केला आहे आणि त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत, असे या आरोपपत्राच्या शेवटी म्हटले आहे.एक वर्षापूर्वी दिल्ली पोलिसांनी ७५ वर्षीय पचौरी यांच्याविरुद्ध भादंविच्या विविध चार कलमान्वये गुन्हे दाखल केले होते आणि आता त्याच गुन्ह्यांखाली त्यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. टेरीच्या एका महिला कर्मचाऱ्याने पचौरी यांच्या विरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. पचौरी यांनी फेब्रुवारी २०१४ आणि मार्च २०१५ या दरम्यान आपल्या मोबाईल फोनवरून तक्रारकर्त्या महिलेला एकूण ३४ वेळा कॉल केला, तर तक्रारकर्त्या महिलेने त्यांना २६ वेळा कॉल केला, असे या आरोपपत्रात म्हटले आहे. याशिवाय सप्टेंबर २/१३ आणि फेब्रुवारी २०१५ या काळात पचौरी व महिलेदरम्यान आदानप्रदान करण्यात आलेल्या सहा हजारावर एसएमएस आणि व्हॉट्स अ‍ॅपचा तपशील त्यात दिलेला आहे.आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अज्ञात इसमांकडून ‘हॅक’ करण्यात आले होते, हा पचौरी यांचा युक्तिवाद पोलिसांनी फेटाळून लावला आहे. तथापि याबाबतचा फोरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेचा अहवाल मात्र प्राप्त व्हायचा आहे. पोलीस या अहवालाची प्रतीक्षा न करता आरोपपत्र न्यायालयात दाखल करणार असल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘आपण पचौरी यांच्या कार्यालयात रुजू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (३ सप्टेंबर २०१३) त्यांनी आपल्याला एसएमएस पाठविला. यापुढे मी तुला लाईफ (लवली इन्स्पिरेशन आॅफ एक्सेसिव्ह फौंडनेस) असे संबोधणार असल्याचे लिहिले होते. त्यानंतर पचौरी हे अश्लील विनोद आणि कविता असलेले एसएमएस रोजच पाठवायचे,’ असे तक्रारकर्त्या महिलेचे म्हणणे आहे.