पं.पन्नालाल घोष संगीत संमेलन उत्साहात
By admin | Updated: May 9, 2014 21:13 IST
कोल्हापूर : बासरी वादनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून आयोजित केले जाणारे पंडित पन्नालाल घोष संगीत संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी पंडित नित्यानंद हळदीपूर यांना पं. पन्नालाल घोष स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर हळदीपूर यांनी आपल्या बासरी वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
पं.पन्नालाल घोष संगीत संमेलन उत्साहात
कोल्हापूर : बासरी वादनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून आयोजित केले जाणारे पंडित पन्नालाल घोष संगीत संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी पंडित नित्यानंद हळदीपूर यांना पं. पन्नालाल घोष स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर हळदीपूर यांनी आपल्या बासरी वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मैफलीचे उद्घाटन प्रवीणसिंह घाटगे राजे, संजय शिंदे, प्रा. सचिन जगताप, दिलीप गुणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. मैफलीची सुरुवात हळदीपूर यांनी राग देसने केली. ध्रूपद धमार अंगाने विलंबित एकतालात त्यांनी पन्नालाल घोष यांच्या शैलीने हा राग सादर केला. त्यानंतर द्रूत तीनतालातील बंदिश, श्रृंगाररसातील दीपचंदी तालात ठुमरी सादर केली. राग पिळूच्या विविध छटा सादर करून रसिकांची मने जिंकली. राग दीपावली या दुर्मीळ रागाने मैफलीची सांगता केली. त्यांना सचिन जगताप, निखील भगत यांनी साथसंगत केली. डॉ. रसिका देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. -------------------फोटो नं ०९ कोल पन्नालाल घोष ओळ : पं. पन्नालाल घोष संगीत संमेलनात बासरीवादक पंडित नित्यानंद हळदीपूर यांनी बासरीवादन केले. ---------------------