शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

इतक्याशा पैशात फक्त पकोड्याचा स्टॉलच काढता येईल; चिदंबरम यांनी उडविली मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेची खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 08:49 IST

भाजपाने गेल्या चार वर्षांमध्ये आर्थिक आघाडीवर केलेल्या चुका एकवेळ सुधारता येतील. पण भाजपाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे निर्माण झालेला सामाजिक घोळ निस्तरता येणे अवघड आहे.

ठाणे: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तुटपुंज्या अनुदानावारून प्रधानमंत्री मुद्रा योजनेची खिल्ली उडविली. ते रविवारी ठाण्यातील एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत लघुद्योगांना 10 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांत या योजनेतंर्गत वितरीत करण्यात आलेली सरासरी रक्कम 43 हजार इतकीच आहे. इतक्या कमी पैशात कोणत्याही उद्योजकाला भरीव गुंतवणूक करता येणे शक्य नाही. त्यामुळे एवढ्याशा पैशात फक्त पकोड्याचा स्टॉलच सुरू करता येणे शक्य आहे, असा टोला पी. चिदंबरम यांनी मोदींना लगावला. काही दिवसांपूर्वी देशातील वाढत्या बेरोजगारीवरून सरकारवर होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करताना नरेंद्र मोदींनी पकोड्याचे उदाहरण दिले होते. रोजगार म्हणजे केवळ नोकऱ्या नव्हेत. एखादा व्यक्ती पकोड्याचा स्टॉल चालवत असेल तर तोदेखील एकप्रकारचा रोजगारच आहे, असे मोदींनी म्हटले होते. यावरून विरोधकांनी मोदी सरकार प्रचंड टीकाही केली होती. याशिवाय, पी. चिदंबरम यांनी कार्यक्रमात सरकारच्या आर्थिक व सामाजिक धोरणांवरही टीका केली. भाजपाने गेल्या चार वर्षांमध्ये आर्थिक आघाडीवर केलेल्या चुका एकवेळ सुधारता येतील. पण भाजपाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे निर्माण झालेला सामाजिक घोळ निस्तरता येणे अवघड आहे. भाजपाच्या निर्णयांमुळे समाजातील काही घटकांपर्यंत चुकीचा संदेश गेला आहे. या लोकांना अचानकपणे आपण दुय्यम दर्जाचे नागरिक आहोत, असे वाटायला लागले आहे. याशिवाय, भाजपा सरकारच्या काळात खानपानाच्या पद्धती आणि सामाजिक वर्तनावरूनही अनेक वाद निर्माण झाल्याचे पी. चिदंबरम यांनी सांगितले. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदी