शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पान 4- पोस्टगावगिरी

By admin | Updated: August 26, 2015 00:19 IST

पोस्ट गावगिरी : नेरूल

पोस्ट गावगिरी : नेरूल
जगाला प्रेम अर्पावे..
गोव्यातील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यानंतर जवळपास 40 वर्षे धार्मिक सलोखा जोपासला होता. ईदच्यावेळी ख्रि?न व हिंदू बांधवाचा उत्साह ओसांडून वाहायचा. ख्रिसमसच्यावेळी हिंदू व मुसलमान आपला सण म्हणून साजरा करायचे, तर दिवाळी व गणपतीच्यावेळी मुसलमान आणि ख्रिश्चन हिंदू बांधवांना मिठाई द्यायचे. असा बंधूभाव मागील दहा वर्षांपासून थोडा कमी होत चालल्याचे दिसून येते. त्यात काही विघ्नसंतोषी माणसे द्वेष आणखीनच प्रज्वलित करीत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे नेरूलमधील डॉन बॉस्को कॉलेज. या ख्रिस्ती शिक्षण आस्थापनाने घेतलेल्या जमिनीत पूर्वांपार असलेले कालिमातेचे मंदिर कोणी नतद्रष्टाने रातोरात तोडले. हेतू हाच की हिंदू-ख्रि?नांमध्ये भांडणे व्हावी; परंतु सर्वधर्मसमभाव पाळणार्‍या नेरूलच्या हिंदू ग्रामस्थांनी तसा अर्थ लावू दिलाच नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे देवळासाठी सलग 48 तास चाललेल्या संघर्षात नेरूल पंचायतीचे तीन ख्रिस्ती पंच घटनास्थळी आलेच नाहीत. उरलेल्या चार पंचसदस्यांनी हा प्रo्न रेटून धरल्याने देवळाची पुनर्बांधणी मात्र पूर्ण झाली. यावरूनच गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडण्याचे काम गोव्यातील काही मोजक्या व्यक्ती करीत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले. जो धारणा करतो तो धर्म. समाजाची चुकीची धारणा करतो तो कोणताही धर्म असू शकत नाही. तो झाला अधर्म. सर्व धर्मांची हीच शिकवण आहे. माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म या धारणेने आपण जगूया. साने गुरुजींनी म्हटले आहे ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..’ नेरूलमधील घटनेने आपण एवढा धडा मनोमन जपूया त्यातच आपल्या सर्वांचे हित आहे.
- दिनेश केळुस्कर