हैदराबाद : गेल्या आठवड्यात काँग्रेस नेत्यांवर हल्ला केल्याप्रकरणी ‘एआयएमआयएम’चे (आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमीन) प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी शरणागती पत्करली, मात्र त्यांची लगेच जामिनावर मुक्तता झाली.हैदराबादचे खासदार असलेल्या ओवेसी यांनी उपपोलीस आयुक्त (दक्षिण) व्ही. सत्यनारायण यांच्यासमक्ष शरणागती पत्करली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन प्रकृती तपासण्यासाठी शासकीय रुग्णालयात नेले. त्यानंतर स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या दोन सुरक्षा ठेवींवर जामीन मंजूर करण्यात आला. (वृत्तसंस्था)
ओवेसींची शरणागती आणि जामीन
By admin | Updated: February 9, 2016 01:40 IST