शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर खरेदीने केली मात

By admin | Updated: July 15, 2015 23:12 IST

लातूर : रमजान ईदनिमित्ताने शहरातील गंजगोलाई परिसरातील कापड गल्लीत नवीन कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे़ पाऊस नसल्याने बाजारपेठेतील आकर्षक खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे़ शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने कपडा बाजारांत किमान १० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे़

लातूर : रमजान ईदनिमित्ताने शहरातील गंजगोलाई परिसरातील कापड गल्लीत नवीन कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे़ पाऊस नसल्याने बाजारपेठेतील आकर्षक खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे़ शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने कपडा बाजारांत किमान १० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे़
रमजान ईदनिमित्ताने मुस्लिम बांधव कुटुंबातील अबालवृध्दांना नवीन कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करीत आहेत़ यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे काही प्रमाणात बाजारपेठेवर परिणाम झाला असला तरी आणखीन दोन दिवस सणाला अवधी आहे़ त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आणखीन उत्साह दिसून येणार आहे़ चिमुकली मुले आपल्या कुटुंबासोबत रेडिमेड कपडे खरेदीसाठी बाजारात असल्याचे दिसून येत आहे़ मनाप्रमाणे ड्रेस खरेदी करताना चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत आहे़ बाजारपेठेत वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे उपलब्ध आहेत़ बीरजीस, थ्रीपीस, मोदी ड्रेस,जिन्स पॅन्ट व टीर्शट अशी आकर्षक कपडे असली तरी मोदी ड्रेसची बच्चे कंपनीवर भूरळ पडल्याचे खरेदीवरुन पहावयास मिळत आहे़ अशा ड्रेसच्या किंमती ७०० रुपयांपासून ते २ हजार रूपयांपर्यंत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ नेहरु, पायजमा व जॅकेट अशी या ड्रेसची रचना आहे़
मुलींचा ओढा जोया,अनारकली, मसकलीकडे़़़
बदलत्या काळानुसार कपडे खरेदीत मुलींच्या आवडी- निवडी बदल्याचे दिसून येत आहे़ दूरचित्रवाहिनीवरील मालिकेत प्रसिध्द असलेल्या जोया ड्रेस, मसकली ड्रेस, अनारकली या कपड्यांना विशेष पसंती असल्याचे पहावयास मिळत आहे़
रेडिमेडची के्रझ़़़़
तरुणांची कपडे खरेदी करण्याची क्रेझ बदलली आहे़ शिवून कपडे घेण्यापेक्षा रेडिमेड कपडे खरेदीवर भर असल्याचे दिसून येत आहे़