शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

७७२ पैकी ३९७ ग्राम पंचायतीत महिला राज -१

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

७७२ पैकी ३९७ ग्राम पंचायतीत महिला राज

७७२ पैकी ३९७ ग्राम पंचायतीत महिला राज
महिला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर :

नागपूर :
नागपूर जिल्ह्यातील एकूण ७७२ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३९७ ग्राम पंचायतींच्या सरपंचपदी महिला विराजमान होतील. जिल्ह्यातील सरपंचपदाच्या महिला आरक्षणाची सोडत शुक्रवारी पार पार पडली.
अतिरिक्त जिल्हाधिकारी कादंबरी भगत यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली. यात एकूण ७७२ ग्रामपंचायतींपैकी ३९७ ग्राम पंचायती महिला सरपंचासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण १३७ पैकी ७१ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव ठरल्या. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ९७ पैकी ग्राम पंचायतींपैकी ५२ ग्राम पंचायती महिलांसाठी राखीव, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या २०८ पैकी १०७ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव तर सर्वसाधारण गटामध्ये एकूण ३३० जागांपैकी १६७ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.
तालुकानिहाय विचार केला असता काटोल तालुक्यातील एकूण ८३ ग्रामपंचायतींपैकी अनुसिूचत जातीसाठी (७), अनुसिूचत जमातीसाठी (६) नामाप्रसाठी (११) आणि सर्वसाधारणसाठी १८ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. नरखेड तालुक्यात अ. जाती (६), अ. जमाती (४), नामाप्र (१०), सर्वसाधारण (१६), सावनेर- अ. जाती (८), अ. जमाती (४), नामाप्र (१०), सर्वसाधारण (१६), कळमेश्वर - अ.जाती (४), अ. जमाती (३), नामाप्र (७), सर्वसाधारण (१२), रामटेक - अ.जाती (३), अ. जमाती (१०), नामाप्र (६), सर्वसाधारण (५), पारशिवनी - अ.जाती (४), अ. जमाती (३), नामाप्र (७), सर्वसाधारण (१२), मौदा - अ.जाती (४), अ. जमाती (२), नामाप्र (९), सर्वसाधारण (१७), कामठी - अ.जाती (५), अ. जमाती (२), नामाप्र (७), सर्वसाधारण (११), उमरेड - अ.जाती (५), अ. जमाती (४), नामाप्र (७), सर्वसाधारण (९), भिवापूर - अ.जाती (६), अ. जमाती (५), नामाप्र (८), सर्वसाधारण (१०),कुही - अ.जाती (६), अ. जमाती (२), नामाप्र (८), सर्वसाधारण (१५), नागपूर (ग्रामीण) - अ.जाती (८), अ. जमाती (४), नामाप्र (९), सर्वसाधारण (१४), हिंगणा - अ.जाती (५), अ. जमाती (४), नामाप्र (८), सर्वसाधारण (१२) याप्रमाणे महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.