आमची माती... भिवापूर जोड
By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि आहार मिळण्याकरिता दाणी सरांची रात्रंदिवस धडपड सुरू असते. शाळेत १०० टक्के पटनोंदणी, शून्य टक्के गळती, उत्कृष्ट निकाल आणि पटनोंदणीसाठी शालेय परिसर बोलका करणे, शैक्षणिक साहित्य आणि विज्ञान कोपरा बनविणे, किशोरी मेळावा, अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेणे, परसबागेची निर्मिती, चित्रकला स्पर्धा, शाळा परिसर व गावात वृक्षारोपण केल्यानंतर लोकवर्गणीतून त्याला कुंपण घालणे, मोठ्या वृक्षांभोवती चबुतरा बनवून त्यावर वृक्षसंपत्तीचे महत्त्व पटवून देणारे फलक त्यांनी लावले. यासाह गावात कुटुंबनियोजन या उपक्रमाला हातभार लावला.
आमची माती... भिवापूर जोड
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि आहार मिळण्याकरिता दाणी सरांची रात्रंदिवस धडपड सुरू असते. शाळेत १०० टक्के पटनोंदणी, शून्य टक्के गळती, उत्कृष्ट निकाल आणि पटनोंदणीसाठी शालेय परिसर बोलका करणे, शैक्षणिक साहित्य आणि विज्ञान कोपरा बनविणे, किशोरी मेळावा, अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेणे, परसबागेची निर्मिती, चित्रकला स्पर्धा, शाळा परिसर व गावात वृक्षारोपण केल्यानंतर लोकवर्गणीतून त्याला कुंपण घालणे, मोठ्या वृक्षांभोवती चबुतरा बनवून त्यावर वृक्षसंपत्तीचे महत्त्व पटवून देणारे फलक त्यांनी लावले. यासाह गावात कुटुंबनियोजन या उपक्रमाला हातभार लावला. मिहानअंतर्गत कार्यरत लुपिन फाऊंडेशन या सामाजिक संस्थेशी मैत्रीपूर्ण संबंध जूळवून त्यांना गाववजा शाळेशी जोडले. दाणी सरांच्या कार्याची दखल घेत या संस्थेने दोन लाख रुपयांचे साहित्य दिले, शिवाय विविध शिबिरांचे आयोजनसुद्धा केले जात आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानशरीराने अपंग असलेल्या ओंकारनाथ दाणी यांच्या कार्याची दखल घेत त्यांना तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षकदिनाचे औचित्य साधून गतवर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आदर्श शिक्षक पुरस्काराने दाणी सरांचा गौरव केला. खाजगी संस्थांकडूनसुद्धा त्यांना गौरविण्यात आले आहे. आई-वडिलांकडूनच ओंकारनाथ दाणी यांना सेवेचा वसा मिळाला आहे.......फोटो:- ओंकारनाथ दाणी