शहरातील स्वच्छतेसाठी अन्य पालिकांचा अभ्यास आयुक्तांची माहिती : नवी मुंबईच्या धर्तीवर पेस्टकंट्रोलचा विचार
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
नाशिक : शहरातील स्वच्छतेबाबत कोणते चांगले प्रकल्प राबविता येतील, याबाबत राज्यातील अन्य महापालिकांच्या स्वच्छताविषयक प्रकल्पांचा अभ्यास केला जाणार असून, नवी मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी सुरू करण्याबाबतचा विचार सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.
शहरातील स्वच्छतेसाठी अन्य पालिकांचा अभ्यास आयुक्तांची माहिती : नवी मुंबईच्या धर्तीवर पेस्टकंट्रोलचा विचार
नाशिक : शहरातील स्वच्छतेबाबत कोणते चांगले प्रकल्प राबविता येतील, याबाबत राज्यातील अन्य महापालिकांच्या स्वच्छताविषयक प्रकल्पांचा अभ्यास केला जाणार असून, नवी मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी सुरू करण्याबाबतचा विचार सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.येत्या महासभेत आयुक्तांनी धूर व अळीनाशक औषध फवारणीचा प्रस्ताव ठेवला होता; परंतु सदर प्रस्ताव मागे घेण्यात आला असून, तो आणखी परिपूर्ण करण्यात येऊन महासभेवर ठेवला जाणार असल्याचे आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, पेस्टकंट्रोल, स्वच्छता याबाबत अन्य महापालिकांनी कोणते प्रकल्प राबविले आहेत. त्याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार पालिकेचे आरोग्य विभागाचे पथक नुकतेच नवी मुंबई येथे जाऊन आले आहे. त्याठिकाणी ४५० किलोमीटर क्षेत्रात अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छताविषयक योजना राबविण्यात आल्या आहेत. जीपीएस लावला नाही तर दंडाची तरतूद आहे. डॅशबोर्ड संगणकावर दिसू शकेल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्यावर दंडाची तरतूद आहे. शिवाय सात दिवसांत होणार्या फवारणीचे वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचारी, कोठे फवारणी होते आहे, याची माहिती मिळू शकते. नवी मंुबईने राबविलेल्या चांगल्या काही योजना नाशिकमध्येही राबविता येऊ शकेल. त्यासंबंधीचा अभ्यास केला जात आहे. याशिवाय अन्य तीन-चार महापालिकांचेही कामकाज पाहिले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, उड्डाणपुलाखालील दुभाजकांच्या जागेबाबतचा हस्तांतरण करार लवकरच केला जाणार असून, शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणाविरुद्ध मोहीम सुरूच राहणार असल्याचेही डॉ. गेडाम यांनी सांगितले.इन्फोऐकावे जनाचे, करावे कायद्यानेम्हसोबावाडीतील अतिक्रमणाबाबत बोलताना आयुक्तांनी कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. या अतिक्रमणाबाबत संबंधित अतिक्रमणधारकांशी चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीबद्दल आयुक्त म्हणाले, सर्वांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. ऐकावे जनाचे, करावे कायद्याने. ज्या भागातील अतिक्रमण होते तेथील स्थानिक नगरसेवकांनाही माहिती दिली पाहिजे व चर्चेत सहभागी करून घेतले पाहिजे यासाठी स्थानिक नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते, असा खुलासाही डॉ. गेडाम यांनी केला. इन्फोलाड कमिटीनुसार अनुकंपा प्रस्तावांवर कार्यवाहीलाड समितीनुसार पालिका अधिकार्यांकडून माहिती घेण्यात आली असून, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले सफाई कर्मचारी आणि मयत झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना मनपा सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया नियमानुसार सुरू केली जाईल. पालिकेकडे ३७ प्रस्ताव तयार असून, त्याबाबतची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याचेही आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सांगितले.