शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा मुशायरा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 02:01 IST

अकोला: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्मनिरपेक्ष विचाराचे स्मरण करीत देशभरातून आलेल्या शायरांनी आपल्या उर्दू काव्यरचना सादर करीत शिवरायांना शुक्रवारी रात्री अकोल्यात अनोखे अभिवादन केले.

अकोला: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्मनिरपेक्ष विचाराचे स्मरण करीत देशभरातून आलेल्या शायरांनी आपल्या उर्दू काव्यरचना सादर करीत शिवरायांना शुक्रवारी रात्री अकोल्यात अनोखे अभिवादन केले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात ऑल इंडिया उर्दू मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापालिकेचे विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण होते. प्रमुख अतिथी म्हणून भारिपचे गटनेते गजानन गवई, राष्ट्रवादीचे गटनेते राजकुमार मूलचंदानी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना साजिदखान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील मावळे एकत्रित करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आज माणसा-माणसात अंतर निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जात आहे. धर्मनिरपेक्षतेचे खरे उद्गाते शिवराय होते. त्यांना एखाद्या युद्धामध्ये कुराणाची प्रत सापडली तर ते सैनिकांना म्हणायचे वाटेत मशिदीत अत्यंत श्रद्धापूर्वक हे अस्मानी पुस्तक इमामाकडे द्या. दुभंगलेली मने साधण्यासाठी पुनश्च शिवरायांच्या सर्वसमावेशक विचारांची गरज असल्याचे पठाण यांनी सांगितले.
मुशायरात जागतिक कीर्तीचे शायर मन्नान फराद (जबलपूर), हामीद भुसावली, अफजाल दानिश (बुरहानपूर), अजीमशाद रायपुरी, नईम फराद (अकोला), फारुख जमन या शायरांनी जीवनाभवाच्या व सामाजिक सलोख्याच्या कसदार रचना सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. मुशायराचे बहारदार उर्दू-मराठी सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी अजीम नवाज राही यांनी केले.
आरंभी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उत्सव समितीच्या वतीने नागेश जाधव, योगेश सुर्वे, संयज सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, योगेश थोरात, सुभाष म्हैसने, सागर जाधव, गोपीअण्णा चाकर, सुधीर काहकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तब्बल चार तास चाललेल्या विविध आशयाच्या आशयगर्भ काव्यरचना शायरांनी सादर करून अकोलेकरांना अनोखी मेजवानी दिली. (प्रतिनिधी)