शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

महिला बालकल्याण समितीतर्फे महिला महोत्सवाचे आयोजन

By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST

समिती सभा : पालिका प्रशासनाने समितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

समिती सभा : पालिका प्रशासनाने समितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
नाशिक : महिलांच्या अंगभूत कलांना वाव मिळावा यासाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त २ ते ८ मार्चदरम्यान महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव आज महिला बालकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.
महिलादिनानिमित्त दि. २ मार्चपासून हे कार्यक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव सभेत सादर करण्यात आला. त्यात २ मार्च रोजी उद्घाटन झाल्यानंतर सर्व विभागीय कार्यालयांमध्ये रांगोळी स्पर्धा, ३ मार्च रोजी पुष्परचना स्पर्धा, ४ मार्च रोजी वेशभूषा स्पर्धा, ५ मार्च रोजी पाककला स्पर्धा, ६ मार्च रोजी फॅशन शो आणि ७ मार्च रोजी मेहेंदी व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात येईल.
याशिवाय २ ते ७ मार्चदरम्यान महिलांविषयक विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या व्य्याख्यानात कायदा, वैद्यकीय, क्रीडा, पत्रकारिता, उद्योग आणि साहित्य या विषयावरील तज्ज्ञांना आमंत्रित करण्याचा प्रस्ताव पारीत करण्यात आला. याशिवाय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनाचाही प्रस्ताव त्यात ठेवण्यात आला असून, यासाठी एकत्रित ५८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यात म्हटले आहे. या बैठकीला सभापती रंजना बोराडे, ललिता भालेराव, सुमन ओहोळ, वैशाली दाणी, मनीषा हेकरे आदि उपस्थित होते.
महिला बालकल्याणची चेेन्नई एक्स्प्रेस
महिला बालकल्याण समितीच्या अभ्यास दौर्‍यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. त्यात पुण्याऐवजी समितीचा दौरा चेन्नई येथे आयोजित करण्यावरही सदस्यांची संमती घेण्यात आली. याआधी पुणे आणि बंगळुरू येथे आयोजित केलेल्या दौर्‍यावर फेरविचार करून हा दौरा आता चेन्नई येथे नेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. हे दोन्ही प्रस्ताव मान्यतेसाठी येत्या सभेवर ठेवण्यात येणार आहेत.
महिला सदस्यांची नाराजी
महिला बालकल्याण समितीच्या सभेला प्रशासनाच्या वतीने आयुक्तांनी लक्ष दिले पाहिजे. या समितीसाठी प्रकल्प अधिकारी नाही, कार्यालयात महापुरुषांच्या तसबिरी नाहीत. याशिवाय अंगणवाडीतील मुलांच्या समस्याही गंभीर असून, त्याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी मागणी महिला सदस्यांनी केली.
मुख्यसेविका भरतीला मंजुरी
पालिकेच्या अंगणवाड्यांसाठी सहा मुख्यसेविका भरतीला परवानगी मिळाल्याने बर्‍याच काळापासून रखडलेला मार्ग आता मोकळा झाला आहे.