नवी दिल्ली : दिल्लीतील 2क्क्8 च्या बाटला हाऊस चकमकीच्या सहाव्या स्मृतिदिनी शुक्रवारी इसिसशी संबंधित अन्सार-उल-तावहीद फी बिलाद अल हिंद (एयूटी) या संघटनेने या घटनेचा सूड उगविण्याचा इशारा दिला आहे. इसिसचा प्रमुख अबू बक्र अल
बगदादी याचा संदेश देणारा हिंदी, उर्दू आणि तामिळ शीर्षके असलेला व्हिडिओ अपलोड करण्यात
आला असून, त्यात बाटला
चकमकीत ठार झालेल्या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांना हुतात्मा घोषित केले.
अफगाणिस्तान-पाकिस्तानातील एखाद्या संघटनेने भारतातील चकमकीशी संबंध जोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुजाहिदीनने अनेक स्फोटांची जबाबदारी घटनेआधी आणि नंतर ई-मेल पाठवून घेतली असली तरी बाटला हाऊस चकमकीनंतर तसे केलेले नाही. या चकमकीत मारले गेलेले पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा यांच्या हत्येची जबाबदारीही या संघटनेने घेतली नाही.
या चकमकीबद्दल अजूनही वाद सुरू आहे. नागरी हक्क कार्यकत्र्यानी ही चकमक बनावट असल्याचा दावा करतानाच मारले गेलेले लोक निरपराध असल्याचे म्हटले होते.
सदर व्हिडिओत मुजाहिदीनच्या अतिरेक्यांना हुतात्मा ठरविण्यात आल्यामुळे बनावट चकमकीचा दावा निकाली निघू शकतो. एयूटीच्या टि¦टर हँडल ्र2ुंंँेी्िरं2 या पत्त्यावरून अनेक संदेश पाठविण्यात आले असून, त्यात बाटला हाऊस इन्शाल्ला आम्ही बदला घेऊ, अशा आशयाची धमकी आहे.
या संघटनेने मुजाहिदीनचे अतिरेकी आतिफ अमीन आणि मोहंमद साजीद यांना
हुतात्मा घोषित केले असून, अन्य अतिरेक्यांच्या फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेचा बदला घेण्याची धमकी दिली आहे.
भारताविरुद्ध जिहाद
विविध इसिस अतिरेक्यांनी हिंदी, तामिळ आणि उर्दू भाषेतील शीर्षकअसलेले तीन वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले असून, शुक्रवारी नमाजानंतर बगदादी याचा संदेश जारी करण्यात आला. त्यात अन्य देशांसोबत भारताविरुद्ध जिहाद पुकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
च्इंग्रजी, हिंदी आणि अरेबिक भाषांतील संदेशात अमीन आणि साजीदची चित्रे असून त्यांना शहीद संबोधण्यात आले आहे. बाटला हाऊस चकमकीतील शहीद, तसेच शिक्षा भोगत असलेल्या मुस्लिमांना न्याय देण्यासाठी जागतिक खिलापतच्या आधिपत्याखाली भारतात शरियत कायदा आणोर्पयत आम्ही स्वस्थ बसणार नाही. पोलिसांनी या संदेशाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. संदेशाच्या विश्लेषणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे पोलिसांनी म्हटले. मुजाहिदीनने मीडियाच्या माध्यमातून सर्वप्रथम अस्तित्व दाखविताना पाठविलेल्या संदेशाच्या धर्तीवरच हे ई-मेल असल्याचे एका सुरक्षा अधिका:याने स्पष्ट केले.