- डॉ. खुशालचंद बाहेतीमुंबई : ३५३ च्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणाऱ्याने ज्या पोलीस उपनिरीक्षकाचा अवमान केला त्याची हात जोडून माफी मागावी, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिले आहेत.पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान एका वाहनाला थांबविल्यानंतर त्यातील ५ जणांनी थिरुकुरुंगडीच्या पोलीस उपनिरीक्षकाशी वाद घालून त्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. पोलिसांनी त्यांना पकडत असताना एक जण निसटला. या सर्वांविरुद्ध ३५३ (सरकारी कर्मचाºयावर हल्ला), ५०६ (धमकी देणे), २९४ (अश्लील शब्द वापरणे) या भारतीय दंड विधानातील कलमांप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. यावेळी पळून गेलेल्या व्यक्तीचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठापुढे सुनावणीसाठी आला होता. न्या. जी.आर. स्वामीनाथन यांनी आरोपी अर्जदारास त्यांनी ज्या पोलीस उपनिरीक्षकाचा अवमान केला, त्यांना प्रत्यक्ष भेटावे आणि त्यांची हात जोडून माफी मागावी, असे आदेश दिले.
अवमानाबद्दल पोलिसांची हात जोडून माफी मागावी, उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 02:30 IST