शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ममदापूर साठवण तलाव योजनेचे काम सुरु करण्याचे आदेश

By admin | Updated: October 8, 2016 00:42 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ७४ कोटी रुपये दूध दर फरक देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी पत्रकातून दिली. गतवर्षीच्या तुलनेत फरक रक्कम १९ कोटींची वाढ झाली असून, आजपर्यंतचा हा उच्चांकी दर फरक आहे. दूध संस्थांच्या दहा हजार कर्मचाऱ्यांचीही ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ७४ कोटी रुपये दूध दर फरक देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी पत्रकातून दिली. गतवर्षीच्या तुलनेत फरक रक्कम १९ कोटींची वाढ झाली असून, आजपर्यंतचा हा उच्चांकी दर फरक आहे. दूध संस्थांच्या दहा हजार कर्मचाऱ्यांचीही दिवाळी अधिक गोड होणार असून, त्यांच्यासाठी १४ कोटी ३७ लाख रुपये फरक मिळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दूध संघास १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत दूध पुरवठा झालेल्या म्हैस दुधास प्रतिलिटर २ रुपये २५ पैसे, तर गाय दुधास १ रुपये २५ पैसे याप्रमाणे अंतिम दूध दर फरक दिला आहे. दर फरकातून प्रतिलिटर २० पैसे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स ठेवीपोटी जमा करण्यात आले आहे. त्यामुळे डिबेंचर्स ठेववगळता म्हैस दुधास २ रुपये ५ पैसे, तर गायीसाठी १ रुपये ५ पैसे फरक उत्पादकांना मिळणार आहे. डिबेंचर्सवरील ९ टक्के दराने ३ कोटी ६५ लाख व शेअर भांडवलावर ११ टक्के दराने लाभांश ४ कोटी ३२ लाख असे ७३ कोटी ८१ लाख २ हजार ४७८ रुपये देणार आहे. ही रक्कम १४ आॅक्टोबरला दूध संस्थांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.