शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

माल्याला 10 जुलैला सुरक्षितरीत्या हजर करा, कोर्टाचे गृहमंत्रालयाला आदेश

By admin | Updated: May 10, 2017 16:48 IST

9000 कोटींचा घोटाळा करून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय माल्याला 10 जुलै रोजी न्यायालयात हजर करा

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - 9000 कोटींचा घोटाळा करून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय माल्याला 10 जुलै रोजी न्यायालयात हजर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला आहे. तसेच विजय माल्याला सुरक्षितरीत्या आणण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची असल्याचंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयानंही काही दिवसांपूर्वी विजय माल्याला मोठा झटका दिला होता. त्यावेळी 40 मिलियन यूएस डॉलर म्हणजे सुमारे अडीचशे कोटी रुपये बँकांचं कर्ज विजय माल्याच्या यूबी ग्रुपकडूनच वसूल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.किंगफिशर एअरलाइन्स या आपल्या डब्यात गेलेल्या कंपनीसाठी सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे 9000 कोटी रुपयांची कर्जे बुडवून देशातून परागंदा झालेला मद्यसम्राट उद्योगपती विजय माल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन अवमानाबद्दल दोषी ठरविले आणि याबद्दल शिक्षा सुनावण्यासाठी माल्ल्याला 10 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्रालयानं न्यायालयात हजर करावे, असा आदेश दिला आहे.

(न्यायालयाच्या अवमानाबद्दल माल्ल्या दोषी)
माल्ल्याकडून बुडीत कर्जांच्या वसुलीसाठी मूळ याचिका केलेल्या बँक समूहाने केलेली अवमान याचिका मंजूर करून न्या. ए. के. गोयल आणि न्या. उदय लळित यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. अर्थात आम्ही हा आदेश देत आहोत, पण माल्ल्याला कोर्टापुढे आणणार कसे, असा सवालही खंडपीठाने सरकारला केला. त्यावर ब्रिटनमधून माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असे सरकारने सांगितले. माल्ल्या याने त्याच्या कंपनीचा आणि मालमत्तांचा तपशील द्यावा, असा आदेश दिला होता. त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयानं विजय माल्याला सुरक्षितरीत्या भारतात आणण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची असल्याचंही स्पष्ट केलं होतं.