शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अपहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश: आयुक्तांचा निर्णय

By admin | Updated: January 9, 2016 12:19 IST

महापालिकेत मालमत्ता कर भरणा प्रकरणी ४१ लाख रुपयांचा अपहार करणार्‍या लिपिकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त विलास ढगे यांनी दिले आहेत. प्रशांत लोंढे असे अपहार करणार्‍या लिपिकाचे नाव आहे. अपहाराची रक्कम त्याने महापालिकेच्या तिजोरीत जमा केली आहे.

अहमदनगर : महापालिकेत मालमत्ता कर भरणा प्रकरणी ४१ लाख रुपयांचा अपहार करणार्‍या लिपिकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त विलास ढगे यांनी दिले आहेत. प्रशांत लोंढे असे अपहार करणार्‍या लिपिकाचे नाव आहे. अपहाराची रक्कम त्याने महापालिकेच्या तिजोरीत जमा केली आहे. शहर प्रभाग समिती कार्यालयात दोन महिन्यापूर्वी हा प्रकार समोर आला. सुमारे दोन वर्षापासून अपहार सुरू असल्याचे तपासणीत समोर आले. मालमत्ताधारकाने कराचा भरणा केला. मात्र, तो भरणा लोंढे याने तिजोरीत झाल्याचे भासविले. प्रत्यक्षात या रकमेचा अपहार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर चौकशी समिती स्थापन करून तपासणी करण्यात आली. त्यात ४१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. लोंढे याने अपहार केल्याची लेखी कबुली देत अपहाराची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा केली. त्यानंतर उपायुक्त अजय चारठाणकर यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी यासंदर्भात विधिज्ञाचे मत मागविले. त्यांनीही गुन्हा दाखल करण्याचे मत नोंदविले. त्यानंतर आयुक्त विलास ढगे यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक दिवस उलटले तरी आयुक्त निर्णय देत नसल्याने चर्चेला उधाण आले होते. काही संघटनांनीही आयुक्तांना याबाबत विचारणा केली होती. अखेर आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे लागले. (प्रतिनिधी)