शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

वंदे मातरमला विरोध हा कोतेपणा - योगी आदित्यनाथ

By admin | Updated: April 8, 2017 23:34 IST

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला विरोध करणे हा कोतेपणा असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 8 - वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला विरोध करणे हा कोतेपणा असल्याचे  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. मेरठ अलाहाबादसह अनेक पालिकांमध्ये वंदे मातरम म्हणण्यावरून निर्माण निर्माण झालेल्या विवादावर प्रतिक्रिया देताना आदित्यनाथ यांनी आपले मत मांडले.  
राजभवनामध्ये झालेल्या द गव्हर्नर्स गाइड या पुस्तकाच्या प्रकाशन समारोहात बोलताना ते म्हणाले, "आम्ही 21व्या शतकात भारताला पुढे घेऊन जाऊ इच्छित आहोत. पण आज राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत गावे की न गावे यावरून वाद होताहेत, ही चिंतेची बाब आहे. हा विवाद  कोतेपणा दर्शवतो."
यावेळी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150 व्या स्थापना सोहळ्याच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला. "हायकोर्टाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत गायन झाले होते. त्यावेळी पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि राज्यपाल उपस्थित होते. पण आज या मुद्यावरून वाद होत आहे. काही लोक म्हणताहेत की आम्ही राष्ट्रगीत गाणार नाही. असे म्हणणे हा कोतेपणा आहे. या कोतेपणातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढावा लागेल."
उत्तर प्रदेशमधील पालिकांमध्ये राष्ट्रगीत म्हणण्यावरून वाद सुरू झाला आहे. या वादाची सुरुवात मेरठ येथून झाली. तेथे काही नगरसेवकांनी वंदे मातरम् म्हणण्यास नकार दिला. त्यानंतर अलाहाबाद पालिकेत भाजपाच्या नगरसेवकांनी कामकाजाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनी विरोध केला. अशाच प्रकारचा वाद बरेली आणि वाराणसीच्या पालिकांमध्येही झाला होता.