शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रविशंकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप

By admin | Updated: March 12, 2016 03:04 IST

यमुना नदीच्या काठावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विश्व सांस्कृतिक महोत्सवाच्या संदर्भात पाच कोटींचा दंड भरण्यास स्पष्ट नकार देणारे आर्ट आॅफ लिव्हिंगचे

नवी दिल्ली : यमुना नदीच्या काठावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विश्व सांस्कृतिक महोत्सवाच्या संदर्भात पाच कोटींचा दंड भरण्यास स्पष्ट नकार देणारे आर्ट आॅफ लिव्हिंगचे (एओएल) संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय हरित लवादाने तीव्र आक्षेप घेतला आहे. तथापि हा दंड भरण्यासाठी लवादाने रविशंकर यांच्या संघटनेला आणखी मुदत वाढवून दिली आहे.प्रसंगी तुरुंगात जावे लागले तरी बेहत्तर, पण पाच कोटींचा दंड भरणार नाही, असे रविशंकर यांनी म्हटले होते. ‘आध्यात्मिक उंची गाठलेला एखादा माणूस जेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य करतो तेव्हा कायद्याच्या राज्यावर आघात होतो,’ असे रविशंकर यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या लवादाने म्हटले आहे. तथापि आपली धर्मादाय संस्था आहे आणि एवढ्या कमी वेळेत पाच कोटींची रक्कम जमविणे आपल्याला कठीण जाईल, हा आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनचा तर्क लवादाने मान्य केला आणि २५ लाख रुपये तात्काळ भरण्यास सांगितले. हे २५ लाख रुपये भरले नाही तर केंद्र सरकारने दिलेले २.५ कोटी रुपयांचे अनुदान जप्त करण्यात येईल, असा इशाराही लवादाने दिला.पाच कोटी रुपये हा दंड नसून पर्यावरणाला धोका पोहोचविल्याबद्दलची नुकसानभरपाई आहे, असेही लवादाने स्पष्ट केले. २५ लाख रुपये भरल्यानंतर उर्वरित ४.७५ कोटी रुपये भरण्यासाठी लवादाने एओएलला तीन आठवड्यांची मुदत दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी राष्ट्रीय हरित लवादाने ठोकलेला दंड भरण्यास नकार दिल्याबद्दल राज्यसभेत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. शून्य तास सुरू होताच संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, रविशंकर हे कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत काय? त्यांनी राष्ट्रीय हरित लवादाला आव्हान दिले आहे आणि दंड भरणार नाही, असे जाहीर केले आहे. ही गंभीर बाब आहे. त्यांना त्वरित तुरुंगात पाठवायला पाहिजे. रालोआ सरकार रविशंकर यांच्या पाठीशी आहे.विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेस, डावे पक्ष आणि सपाच्या अन्य सदस्यांनीही यादव यांचे समर्थन केले. हा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे आणि तुम्ही नोटीसही दिलेली नाही, असे सांगून उपसभापती पी. जे. कुरियन यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.