नवी दिल्ली: जनहित याचिकेच्या नावाखाली आम्ही राजकीय विषयांत हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगत लोकसभेतील विरोधीपक्षनेतेपद काँग्रेस पक्षाला देण्यात यावे,अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. ‘लोकसभा अध्यक्षांनी सभाृहात दिलेल्या निकालावर न्यायनिवाडा केला जाऊ शकत नाही. राज्यघटनेने अनुच्छेद 32 अन्वये आम्हाला रिट अधिकारक्षेत्र दिले असले तरी त्याचा वापर आम्ही राजकीय विषयांचा निवाडा करण्यासाठी करू शकत नाही, असे सरन्यायाधीश न्या. लोढा यांच्या खंडपीठाने नमूद केले.
विरोधी नेतेपदासंबंधी याचिका फेटाळली
By admin | Updated: August 9, 2014 02:02 IST