शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

विरोध सरकारच्या सूडबुद्धीला -काँग्रेस

By admin | Updated: December 9, 2015 23:22 IST

नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून बुधवारी लोकसभेत शून्य प्रहरात काँग्रेस आणि भाजपत चांगलीच खडाजंगी झाली. काँग्रेस न्यायालयीन प्रक्रियेच्या विरोधात

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून बुधवारी लोकसभेत शून्य प्रहरात काँग्रेस आणि भाजपत चांगलीच खडाजंगी झाली. काँग्रेस न्यायालयीन प्रक्रियेच्या विरोधात नाही तर विरोधकांबाबत सरकार दाखवीत असलेल्या सूडबुध्दीच्या विरोधात आहे, हे स्पष्ट करताना सभागृहातील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला खडे बोल सुनावले. या आक्षेपाचे खंडन करताना, काँग्रेस संसदेच्या माध्यमातून न्यायलयावर दबाव आणू पाहात असल्याची टीका संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली. संसदेतून काँग्रेसचा न्यायालयांवर दबावया आक्षेपांचे खंडन करतांना संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, काँग्रेसचा खरा आक्षेप नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाच्या निकालावर आहे. संसदेच्या सभागृहांचा वापर करून न्यायालयांवर ते दबाव निर्माण करू इच्छितात. काँग्रेस सत्तेवर असतांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना तुरूंगात डांबण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री असतांना सीबीआय व अन्य यंत्रणांमार्फत मोदींची अनेक तास चौकशी करण्यात आली. या सर्व प्रकारानंतरही संसदेला भाजपने कधी वेठीला धरले नाही. उलट काँग्रेसच्या ३0 लोकांनी लोकसभेत दुष्काळावर सुरू असलेली चर्चा गोंधळ घालून हाणून पाडली. (लोकमत न्यूज नेटवर्क)