शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुगलसरायचे नाव बदलण्यास विरोध, सरकारच्या प्रस्तावावरून राज्यसभेत सपा, बसपाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:40 IST

उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याच्या सरकारच्या प्रस्तावावरुन शुक्रवारी राज्यसभेत गदारोळ झाला.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याच्या सरकारच्या प्रस्तावावरुन शुक्रवारी राज्यसभेत गदारोळ झाला. समाजवादी पार्टी आणि बसपाच्या सदस्यांनी या प्रकरणी सरकारला जाब विचारत आक्रमक रूप धारण केल्याने गोंधळातच कामकाज स्थगित करण्यात आले. या विषयावरील चर्चा थांबवण्यास उपसभापतींनी काँग्रेसच्या छाया वर्मा यांचे नाव पुकारताच, वर्मा यांनी छत्तीसगडमधील मंत्र्याच्या पत्नीच्या जमीन हडपण्याचा विषय उपस्थित केला. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला.सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर सपाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या समोर येत घोषणाबाजी केली. सपाचे नरेश अग्रवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हे रेल्वे स्टेशन १८६२ मध्ये अस्तित्वात आले. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने हावडा ते दिल्ली हा मार्ग रेल्वेने जोडला होता.रेल्वेने या स्टेशनचे नाव दीनदयाळ उपाध्याय करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. अग्रवाल म्हणाले की, सरकार देशाचे चरित्र बदलण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाचे अन्य सदस्य म्हणाले की, ज्यांचे स्वातंत्र्याच्या संघर्षात कोणतेही योगदान नाहीत्यांचे नाव रेल्वे स्टेशनला दिले जात आहे. त्यास उत्तर देताना मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, एका विचारवंताचे नाव देण्यास विरोध करणे अयोग्य आहे. मुगलांचे नाव बदलण्यास तुम्ही निष्कारण विरोध करीत आहात.