शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाद नोटा जमा करण्याची संधी?

By admin | Updated: July 5, 2017 05:33 IST

नोटाबंदीमध्ये चलनातून बाद केलेल्या एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा ज्यांना अडचणीमुळे ठरलेल्या मुदतीत बँकेत जमा करणे शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नोटाबंदीमध्ये चलनातून बाद केलेल्या एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा ज्यांना अडचणीमुळे ठरलेल्या मुदतीत बँकेत जमा करणे शक्य झाले नाही त्यांना या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी द्यायला हवी, अशी आग्रही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घेतली. सरकारनेही यावर विचार करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार याचा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेस दोन आठवड्यांची मुदत दिली.नोटाबंदीच्या निर्णयानुसार भारतीय नागरिकांना बाद नोटा बँकांमध्ये जमा करून त्यापैकी ठरावीक रकमेच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंतची मुदत दिली गेली होती. मात्र अनिवासी भारतीय नागरिक व या काळात परदेशात गेलेल्या नागरिकांना अशा नोटा जमा करण्याची मुदत ३१ मार्च २०१७पर्यंत ठेवली गेली होती.ही मुदत टळून गेल्यानंतर अनेक भागांत नागरिक नानाविध अडचणींच्या सबबी देत नोटा जमा करण्यासाठी बँकांमध्ये गेले होते. परंतु ठरावीक मुदतीत नोटा जमा करण्याच्या या नियमाला अपवाद नाही, असे सांगून त्यांना परत पाठविले. अशा काही व्यक्ती व परभणीच्या शेतकऱ्याने एप्रिलमध्ये याचिका केल्या तेव्हा न्यायालयाने त्या उन्हाळी सुटीनंतर ठेवल्या होत्या. या याचिका मंगळवारी सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहार, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे आल्या तेव्हाही सरकारने नन्नाचा पाढा सुरू ठेवला.सरकारचा पवित्रा बदललान्यायालयाचा पवित्रा पाहून सॉलिसिटर जनरल रणजित कुमार मवाळ झाले व त्यांनी तडजोडीचा फॉर्म्युला सुचविला. ते म्हणाले की, न्यायालयाने बाद नोटा जमा करण्यासाठी सरसकट संधी देण्याचा आदेश देऊ नये. अशा प्रकरणांचा गुणवत्तेवर निर्णय घेण्याचा विचार होईल. सरकारची बदललेली भूमिका लक्षात घेऊन न्यायालयाने ही मर्यादित संधी कशी द्यायची हे नक्की करण्यासाठी सरकार व रिझर्व्ह बँकेस दोन आठवड्यांची वेळ दिली.परभणीच्या शेतकऱ्यांची याचिका नोटाबंदीच्या काळात सोयाबीनचे साडेपाच लाख रु पये घेऊन जात असताना ते निवडणूक प्रचारासाठी चालले असल्याच्या संशयातून प्राप्तिकर विभागाने पकडले होते. हे पैसे त्यांना प्राप्तिकर विभागाने ९ जानेवारीला परत केले. तोपर्यंत ३० डिसेंबरची मुदत उलटून गेली होती. या प्रकरणी अ‍ॅड. दिलीप तौर यांच्यामार्फत शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली आहे. पुढील सुनावणी १८ जुलैला होणार आहे....तर तुम्ही दार बंद करू शकत नाहीतन्यायालयाने म्हटले की, नागरिकांचा घामाचा पैसा तुम्ही अशा प्रकारे कवडीमोल करू शकत नाही. एखादी व्यक्ती ठरलेल्या वेळात नोटा जमा करायला खरोखर अडचण होती असे सांगत असेल व ती अडचण खरी असल्याचे तो सिद्ध करून देत असेल, तर त्याला तुम्ही दार बंद करू शकत नाही. नागरिकांच्या एका वर्गास वाढीव मुदत दिल्याने अडचण सांगणाऱ्या या लोकांनाही संधी देण्याचा विचार करावा लागेल.