शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी संकुलाच्या इमारतींवर बेघरांचे पुनर्वसन करण्यास विरोध

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

* लालबावटा खोकीधारक संघटनेचे नगराध्यक्षांना निवेदन

* लालबावटा खोकीधारक संघटनेचे नगराध्यक्षांना निवेदन
इचलकरंजी : शहरातील विकली मार्केट व पंचवटी चित्रमंदिराजवळील व्यापारी संकुल या दोन्ही इमारतींवर पहिला मजला बांधून त्याठिकाणी बेघरांचे पुनर्वसन करण्याचा नगरपालिकेच्या विशेष सभेत संमत करण्यात आलेल्या प्रस्तावाला विरोध असल्याचे निवेदन लालबावटा खोकीधारक समितीच्यावतीने सोमवारी नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांना देण्यात आले. भेटलेल्या शिष्टमंडळात दोन्ही इमारतींतील लाभार्थ्यांचा समावेश होता.
नगरपालिकेच्या २५ जानेवारीला झालेल्या विशेष सभेमध्ये राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरातील विकली मार्केट व पंचवटी चित्रमंदिराजवळील व्यापारी संकुल या इमारतींवर पहिला मजला बांधून त्याठिकाणी शहरातील भटक्या बेघरांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. मात्र, याठिकाणी असलेल्या लाभार्थ्यांना या लोकांचा उपद्रव होऊन त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होणार आहे. म्हणून लालबावटा खोकीधारक समितीचे अध्यक्ष सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ नगराध्यक्षांना भेटले. शिष्टमंडळामध्ये ईर्शाद बागवान, मुनीर बागवान, विनायक टेके, उत्तम माळी, महेश लोखंडे, विनोद कांबळे, निर्मल कांबळे, आदींचा समावेश होता.
शिष्टमंडळाने नगराध्यक्षा ॲड. स्वामी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी भटक्या बेघरांचे पुनर्वसन साईट नंबर १०२ येथे करावे, असेही या शिष्टमंडळाने सूचित केले. त्यावर बोलताना नगराध्यक्षांनी याबाबत योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)