शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

निलंबनावरून विरोधक एकवटले

By admin | Updated: August 5, 2015 02:07 IST

लोकसभेचे कामकाज सुरू होताच डावे, सपा आणि राजद सदस्यांनी काँग्रेस खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उचलून धरला. लोकसभाध्यक्षांनी यास परवानगी नाकारत

नवी दिल्ली : काँग्रेसच्या 25 खासदारांवर लोकसभाध्यक्षांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात विरोधकांची एकजूट करण्यात मंगळवारी काँग्रेसला लक्षणीय यश मिळाले. लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यानंतर तर काँग्रेस सदस्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सभागृहाबाहेर धरणो दिले. अभूतपूर्व गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर सोनिया गांधी कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. हा हल्ला परतवताना भाजपाने संसदीय पक्षाच्या बैठकीत लोकसभेचे कामकाज सुरू होताच डावे, सपा आणि राजद सदस्यांनी काँग्रेस खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उचलून धरला. लोकसभाध्यक्षांनी यास परवानगी नाकारत प्रश्नोत्तराचा तास पुढे रेटला. याच दरम्यान राजदचे जयप्रकाश नारायण यादव यांनी ‘निलंबन वापस लो’ची घोषणाबाजी सुरू केली. तृणमूल काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल (युनायटेड), राजद, सपा आणि डाव्यांसह अनेक विरोधी पक्षांचे सदस्य यात सहभागी झाले. यानंतर अण्णाद्रमुक आणि बिजू जनता दल हे दोन पक्ष वगळता सर्व विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. राज्यसभेतही काँग्रेसने लोकसभेतील पक्ष सदस्यांच्या निलंबनावरून घातलेल्या गोंधळात प्रश्नोत्तर व शून्य प्रहराचा तास वाहून गेला. यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. सोमवारी काँग्रेसच्या सदस्यांनी फलक दाखवत घोषणा दिल्यानंतर लोकसभाध्यक्षांनी काँग्रेसच्या २५ सदस्यांना ५दिवसांसाठी निलंबित करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, निलंबनाविरुद्ध काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असतानाच भाजप संसदीय पक्षाने विरोधी पक्ष नकारात्मक, गतिरोधक आणि विकास विरोधी असल्याचा आरोप करीत एक प्रस्ताव मंजूर केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)