शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: May 13, 2014 04:39 IST

भाजपाच्या आक्षेपामुळे रखडलेली नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर सोमवारी अखेर मार्गी लागली़.

 नवी दिल्ली : भाजपाच्या आक्षेपामुळे रखडलेली नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर सोमवारी अखेर मार्गी लागली़ आयोगाकडून हिरवा कंदिल मिळताच सरकारने तात्काळ प्रक्रिया सुरू करीत, नव्या लष्करप्रमुख पदासाठी लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीरसिंह सुहाग यांच्या नावाची शिफारस केली़ उच्च सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या लष्करप्रमुखाच्या निवडीस कुठलीही हरकत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यानंतर, संरक्षण मंत्रालयाने सोमवारी तात्काळ नव्या लष्करप्रमुख पदासाठीची आपली शिफारस कॅबिनेटच्या निवड समितीकडे (एसीसी) पाठविली़ संरक्षण मंत्रालयाच्या शिफारशीत केवळ ५९ वर्षीय ले़ जनरल सुहाग यांचे एकट्याचे नाव आहे़ आता पंतप्रधांनाच्या नेतृत्वाखालील एसीसीला या शिफारशीवर निर्णय घ्यायचा आहे़ विद्यमान लष्करप्रमुख विक्रमसिंह येत्या ३१ जुलैला सेवानिवृत्त होत आहेत.पूर्वापार प्रथेनुसार, दोन महिन्यांआधीच पुढील लष्करप्रमुखाची नियुक्ती केली जाते़ तथापि, भाजपाने काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारद्वारा नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता़ नव्या लष्करप्रमुखांची नियुक्ती नव्या सरकारवर सोडायला हवी, असे भाजपाचे मत आहे़ भाजपाच्या आक्षेपानंतर संपुआ सरकारने हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे निर्णयार्थ पाठवला होता़ त्यावर निवडणूक आयोगाने आपली कुठलीही हरकत नसल्याचे संरक्षण आयोगाला सूचित केले़ चालू लोकसभा निवडणुका वा भविष्यात कुठल्याही निवडणुकांमध्ये संरक्षण दलांतील नियुक्त्या, बढत्या, निविदा वा खरेदी प्रक्रिया आदर्श आचारसंहितेंतर्गत येणार नाही़ त्यामुळे नव्या लष्करप्रमुख नियुक्तीची प्रक्रिया सरकार पार पाडू शकते, असे आयोगाने संरक्षण मंत्रालयाला पाठविलेल्या संदेशात स्पष्ट केले आहे़ लोकसभा निवडणूक मतमोजणी निकाल १६ मे रोजी जाहीर होणार आहे़ त्यापूर्वी नव्या लष्करप्रमुखाच्या नियुक्तीची घोषणा होईल, अशी दाट शक्यता आहे़ संरक्षण जाणकारांच्या मते, कुठल्याही सरकारच्या अंतिम कार्यकाळात नव्या लष्करप्रमुखपदाची घोषणा होत असेल, तर त्यामुळे कुठलाही नवा पायंडा पडणार नाही़ खुद्द भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनेही आपल्या कार्यकाळाच्या अंतिम आठवड्यात अ‍ॅडमिरल अरुण प्रकाश यांना नौदलप्रमुखपदी नियुक्त केले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)