शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

अरेरे.... 'सेल्फी विथ डॉटर'मध्ये छापला दिग्विजय सिंह व 'ती'चा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2015 12:43 IST

भारतातील सेल्फी विथ डॉटर या मोहीमेवर वृत्त प्रकाशित करणा-या एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने चक्क दिग्विजय सिंह व एका महिला पत्रकाराचा फोटो छापल्याचा प्रकार समोर आला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २ - भारतातील 'सेल्फी विथ डॉटर' या मोहीमेवर वृत्त प्रकाशित करणा-या एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने चक्क दिग्विजय सिंह व एका महिला पत्रकाराचा फोटो छापल्याचा प्रकार समोर आला आहे. वृत्तपत्राला ही चुक लक्षात आल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असून यावर दिग्विजय सिंह यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह व पत्रकार अमृता राय यांचे काही खासगी छायाचित्र गेल्या वर्षी सोशल मिडीयावर लीक झाले होते. यानंतर दिग्विजय सिंह यांनी अमृता राय यांच्याशी लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी  स्त्री पुरुष जन्मदरातील दरी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सेल्फी विथ डॉटर या मोहीमेची सुरुवात केली होती. यात पित्याने मुलीसोबतचा फोटो सोशल मिडीयावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यातून बेटी बचाओ, बेटी पढाओ हा संदेश देण्याचा मोदींचा प्रयत्न होता व या आवाहनाला आता चांगलाच प्रतिसाद मिळत असून आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनेही याची दखल घेतली आहे.
एका तरुणीने दिग्विजय सिंह यांना चिमटा काढण्याच्या नादात त्यांचा व अमृता राय यांचा फोटो ट्विटवर टाकला. त्याखाली सेल्फी विथ डॉटर एज गर्लफ्रेंड (मुलीच्या वयाच्या प्रेयसीसोबतची सेल्फी) असा संदेश लिहीला होता. न्यूयॉर्क टाइम्सला या फोटोमधील विनोद समजलाच नाही व त्यांनी सेल्फी विथ डॉटर या बातमीत चक्क दिग्विजय सिंह व अमृता रायचा फोटो प्रकाशित केला. याप्रकाराची सोशल मिडीयावर चर्चा रंगताच न्यूयॉर्क टाइम्सने फोटो हटवला असून या प्रकारावर दिलगिरीही व्यक्त केली आहे.