शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सर्व सैनिकांसाठी ओआरओपी

By admin | Updated: September 7, 2015 02:02 IST

सरकार लष्कराचा सर्वतोपरी सन्मान करते. सर्व माजी सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’चा (ओआरओपी) लाभ दिला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी फरिदाबाद येथे केली

नवी दिल्ली/फरिदाबाद : सरकार लष्कराचा सर्वतोपरी सन्मान करते. सर्व माजी सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’चा (ओआरओपी) लाभ दिला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी फरिदाबाद येथे केली. या मुद्यावर विरोधकांनी जवानांना भ्रमित करण्याचे काम केले, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, माजी सैनिकांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले उपोषण मागे घेत असल्याचे मात्र मुख्य मुद्दे सोडविले जाईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले.दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये बदरपूर- मुजेसर मेट्रो रेल्वेमार्गाचे उद्घाटन केल्यानंतर जाहीरसभेत बोलताना मोदींनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसवर हल्लाबोल केला. ओआरओपीचा मुद्दा गेल्या ४२ वर्षांपासून भिजत घोंगडे बनला होता. कोणत्याही सरकारला हा वाद निकाली काढण्याचे धाडस करता आले नाही. याआधीच्या प्रत्येक सरकारने या मुद्याचा उल्लेख केला; मात्र त्यासाठी ठोस प्रयत्न केले नाहीत, असे ते म्हणाले. रेवाडी येथील निवडणूक प्रचार सभेत मी वन रँक वन पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले होते, ते आता पूर्ण केले आहे. नाईलाजास्तव लष्कराची सेवा सोडणाऱ्या जवानांनाही त्याचा समान लाभ मिळेल. माजी सैनिकांना किती रक्कम द्यावी लागणार, याचा यापूर्वीच्या सरकारांना अंदाज लावता आला नाही, त्यामुळे ३०० कोटी ते ५०० कोटींचा अंदाज लावून चर्चा थांबत होती. आमच्या सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली. हा निधी अपुरा पडणारा आहे. त्यामुळे सरकारने ८ ते १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेतील त्रुटी दूर केल्या जातील, त्यासाठी चुका दुरुस्त करण्याचे काम समितीकडे सोपविण्यात आले आहे. किमान १५ वर्षे नोकरी करणाऱ्या तसेच सेवेत असताना गंभीर जखमी होऊन नोकरी सोडाव्या लागणाऱ्या सैनिकांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. मेट्रोमधून प्रवासपंतप्रधान मोदी यांनी रविवारी सॅटेलाईट सिटी फरिदाबादला जोडणाऱ्या बदरपूर लाईन एक्स्टेंशनचे उद्घाटन करण्यासाठी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. जनपथ स्थानकावरून ते सकाळी १० वाजता मेट्रोमध्ये बसले. फरिदाबादच्या बाटा चौक स्थानकापर्यंत त्यांनी प्रवास केला. याआधी ते हेलिकॉप्टरने जाणार होते. त्यांनी अचानक मेट्रोची निवड केल्याने अधिकाऱ्यांसह प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला. काही उत्साही प्रवाशांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढून घेतल्या. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, वीरेंद्रसिंग, राव इंदरजितसिंग आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रमुख मंगूसिंग हेही होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)