शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत फक्त तीनच अर्ज दाखल

By admin | Updated: January 30, 2017 03:08 IST

महापालिका निवडणुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या १४ क्षेत्रीय कार्यालयांपैकी २७ जानेवारीपासून तीन दिवसांत दोन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अवघे तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या १४ क्षेत्रीय कार्यालयांपैकी २७ जानेवारीपासून तीन दिवसांत दोन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अवघे तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. चार प्रमुख राजकीय पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करीत नसल्यामुळे सध्या तरी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त बसून राहावे लागत आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करणे किचकट असल्याचीही चर्चा इच्छुकांमध्ये आहे.भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये शनिवारी सूर्यकांत आंदेकर यांचा एक अर्ज अपक्ष म्हणून दाखल झाला आहे. प्रभाग क्रमांक १८ क मध्ये त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे. याच कार्यालयात जॉन्सन कोल्हापूरे यांनी प्रभाग क्रमांक २० ड साठी रविवारी अर्ज दाखल केला. टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी दुपारी संतोष चाकणकर यांनी प्रभाग क्रमांक ३३ अ साठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज सुरू होते. मात्र भवानी पेठ वगळता एकाही क्षेत्रीय कार्यालयात उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते फिरकले नाहीत.