एफटीआयच्या आंदोलनामागे केवळ राजकारण -पाठक ---------------------
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
जळगाव : पुण्यातील फिल्म ॲन्ड टेलिव्हीजन इन्स्टट्यिुट ऑफ इंडिया (एफटीआय) ही जागतिक स्वरूपाची कला क्षेत्राशी निगडीत संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गेले काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र यात विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण केले जात आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. ग्रामीण भाागातील विद्यार्थ्यालाही या संस्थेत संधी मिळावी म्हणून या संस्थेचे उपकेंद्र सुरू करणे विचाराधीन असल्याचे मत एफटीआयचे सदस्य तथा मुंबई येथील एस.के. सोमय्या विनय मंदिर, ज्युनियर महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केले.
एफटीआयच्या आंदोलनामागे केवळ राजकारण -पाठक ---------------------
जळगाव : पुण्यातील फिल्म ॲन्ड टेलिव्हीजन इन्स्टट्यिुट ऑफ इंडिया (एफटीआय) ही जागतिक स्वरूपाची कला क्षेत्राशी निगडीत संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गेले काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र यात विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण केले जात आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. ग्रामीण भाागातील विद्यार्थ्यालाही या संस्थेत संधी मिळावी म्हणून या संस्थेचे उपकेंद्र सुरू करणे विचाराधीन असल्याचे मत एफटीआयचे सदस्य तथा मुंबई येथील एस.के. सोमय्या विनय मंदिर, ज्युनियर महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केले.प्राचार्य पाठक हे मूळचे अमळनेरचे आहेत. एफटीआयच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर ते प्रथमच अमळनेरात आले असता त्यांनी लोकमतशी संवाद साधला. गजेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षपदी निवडीनंतर निर्माण झालेल्या वादावर ते म्हणाले की, एफटीआय संस्थेत साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, दूरदर्शन अशा कलाक्षेत्रातील नामवंत व्यक्तींची नियुक्ती करावी अशी संस्थेच्या घटनेत तरतूद आहे. त्या तरतुदीला अनुसरूनच केंद्र शासनाने ही निवड केली आहे. मात्र काही जण संस्थेला बळकटी देण्याऐवजी अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.