शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धाडस दाखविले तरच प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडविता येतात!

By admin | Updated: July 4, 2017 01:07 IST

धाडस दाखविले तरच प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडविता येतात. त्यामुळे बदलाला विरोध करण्याच्या मानसिकतेने काम करू नका. अशा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : धाडस दाखविले तरच प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडविता येतात. त्यामुळे बदलाला विरोध करण्याच्या मानसिकतेने काम करू नका. अशा मानसिकतेमुळेच भारताला क्षमता असूनही हवी तेवढी प्रगती करता आली नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. २०१५च्या आयएएस तुकडीच्या अधिकाऱ्यांपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी भाषण झाले. मोदी म्हणाले की, ज्या देशांनी भारतानंतर स्वातंत्र्य मिळविले आहे, ज्यांच्याकडे साधनांची कमतरता होती त्यांनी विकासाच्या बाबतीत नवी उंची गाठली आहे. तरुण प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते म्हणाले की, बदलांना विरोध करणाऱ्या मानसिकतेपासून दूर राहण्याची गरज आहे. भारताची प्रशासकीय व्यवस्था नव्या उर्जेने भरुन टाकायला हवी. व्यवस्थेतील परिवर्तनासाठी गतिशील बदलांची आवश्यकता आहे. मोदी म्हणाले की, सहायक सचिव म्हणून आगामी तीन महिन्याच्या कालावधीत त्यांनी केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधावा. कारण, येथील व्यवस्थेला त्यांची उर्जा आणि नवे विचार तसेच सचिव स्तरांच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकारांचा फायदा होईल. यूपीएससीच्या निकालापर्यंतचे आपले आयुष्य, त्यांनी स्वीकारलेली आव्हाने व आतापर्यंतच्या संधी यावर त्यांनी विचार करावा. जेणेकरुन व्यवस्था आणि सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकेल. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.