नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्ष महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत असले तरी, महिला उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या बाबतीत मात्र सर्वच पक्ष उदासीन असल्याचे दिसत आहे. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, आप व भाजप या बड्या पक्षांनी मिळून केवळ १९ महिलांना तिकीट दिले आहे.भाजपच्या सर्वाधिक आठ महिला उमेदवार रिंगणात आहेत. त्यात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचा समावेश आहे. ७ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या या निवडणुकीत भाजपच्या अन्य उमेदवारांमध्ये माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ, रेखा गुप्ता, नूपुर शर्मा, किरण वैद्य, रजनी अब्बी, नंदिनी शर्मा आणि माजी महापौर सरिता चौधरी यांचा समावेश आहे.
काँग्रेस, भाजप, आपच्या केवळ १९ महिला उमेदवार
By admin | Updated: February 2, 2015 08:55 IST