शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या आधारभूत दरात फक्त ११ ते २२ टक्के वाढ

By admin | Updated: June 10, 2017 02:45 IST

शेतकरी आणि गरिबांसाठी काम करत असल्याचा दावा मोदी सरकार भलेही करत असेल; पण कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या

नितीन अग्रवाल । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकरी आणि गरिबांसाठी काम करत असल्याचा दावा मोदी सरकार भलेही करत असेल; पण कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिसून येत आहे की, शेतमालाच्या आधारभूत दरात फक्त ११ ते २२ टक्के वाढ झाली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा सांगत आहेत की, शेतकऱ्यांना खर्चाच्या ४३ टक्के नफा जोडून दिला जात आहे; पण प्रत्यक्षात मोदी सरकारने शेतमालाच्या दरात किरकोळ वाढ केली आहे. काय सांगते आकडेवारी?२०१४ च्या तुलनेत २०१७ मध्ये रब्बीच्या पिकांच्या आधारभूत दरात २० टक्के आणि खरिपासाठी ११ टक्के वाढ देण्यात आली. २०१४ - १५ मध्ये गव्हासाठी १४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर निश्चित केला होता. २०१६ - १७ मध्ये हा दर १६२५ करण्याची शिफारस करण्यात आली. हरभऱ्याच्या दरात ३१७५ वरून ४००० एवढी वाढ केली. मसूर डाळीची आधारभूत किंमत ३०७५ वरुन ३९५० प्रति क्विंटल केली. ३१०० रुपये प्रति क्विंटलच्या मोहरीच्या दरात ३७०० पर्यंत वाढ केली. खरिपाच्या पिकांसाठीही आधारभूत दर वाढविण्यात आले. ज्वारीसाठी आधारभूत दर १५७० वरुन १६२५ केले. बाजरी १२७५ वरून १३३०, तूर डाळ ४६२५ वरून ५०५० रुपये, मूग ४८५० वरून ५२२५ आणि उडीद ४६२५ वरून ५००० रुपये दर करण्यात आले.