शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

३,७०० कोटींचा आॅनलाईन गंडा

By admin | Updated: February 4, 2017 01:13 IST

नोएडामध्ये बोगस कंपनी काढून साडेसहा लाख लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून ३,७०० कोटी रुपये उकळणाऱ्या टोळीतील तीन जणांना गजाआड करण्यात आले.

लखनौ : नोएडामध्ये बोगस कंपनी काढून साडेसहा लाख लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून ३,७०० कोटी रुपये उकळणाऱ्या टोळीतील तीन जणांना गजाआड करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) ही कारवाई केली.एसटीएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, नोएडातअब्लेज इन्फो सोल्युशन्स प्रा.लि. नामक कंपनी काढून त्याद्वारे लोकांची फसवणूक करण्यात आली. ही कंपनी आधी ‘सोशल ट्रेड डॉट बिज’ या आॅनलाईन पोर्टलद्वारे चालविण्यात आली. नंतर ती वेगळ्या नावाने चालविण्यात आली. कंपनीचे संचालक अनुभव मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर प्रसाद व तंत्रज्ञान प्रमुख महेश दयाल यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. नोएडाच्या सूरजपूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीची कॅनडा बँकेतील तीन खाती बंद करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये ५२० कोटी रुपयांहून अधिक रक्कम आहे. वेबसाईटच्या माध्यमातून घरबसल्या सोप्या पद्धतीने पैसे कमाविण्याचे आमिष दाखवून या कंपनीने गुंतवणूकदारांना चुना लावला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील कंपन्यांच्या खात्यांमध्ये फारच कमी कालावधीत खूप मोठी रक्कम जमा झाली. या कारस्थानातील एक आरोपी संचालक अनुभव मित्तल बीटेक पदवीधर आहे. तर, श्रीधर प्रसाद हा एमबीए आहे. कंपनीच्या प्रसारासाठी व्टिटर आणि फेसबूकचाही उपयोग करण्यात येत होता. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने या कार्यालयावर टाकलेल्या धाडीत २५० पासपोर्ट जप्त केले आहेत. कॉल सेंटर अथवा अन्य प्रकारच्या कंपनीच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकार नोएडात वाढले आहेत. वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमित पाठक यांनी सांगितले की, या तिघांनी २०१५ मध्ये ही पिरामिड स्कीम सुरु केली. घरी बसून पैसे कमाविण्याचे आमिष या योजनांमधून दिले गेले. सदस्यत्वासाठी या कंपनीकडून ५७५० ते ११५०० रुपये आणि २८७५० ते ५७५०० रुपये घेतले जात होते. या गुंतवणूकदारांना यूजर आयडी आणि पासवर्ड दिला जात होता. नोएडात सेक्टर ६३ मध्ये एक चार मजली इमारत त्यांनी किरायाने घेतली होती.बँका बदलल्याने संशय विशेष बाब म्हणजे या कंपनीचे खाते काही महिन्यांमध्येच एका बँकेतून दुसऱ्या बँकेत वारंवार हलवले जात होते. याबाबत अधिक चौकशी केली असता कंपनीविरुद्ध अनेक तक्रारी दाखल असल्याचे पुढे आले. या प्रकरणात सखोल चौकशी केल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. आता पुढील चौकशी सुरू असून, अटक केलेल्या तिघांच्या आणखी साथीदारांचा शोध घेतला जात आहे.