एक साल बाद.... सीएम केजरीवाल राजीनाम्याचा योगायोग : १४ फेब्रुवारीला रामलीलावर शपथविधी
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल राजीनामा दिल्यानंतर ठीक एक वर्षानंतर म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. ४९ दिवस सत्तेवर राहिल्यानंतर गेल्यावर्षी १४ फेब्रुवारी रोजीच त्यांनी राजीनामा दिला होता. ज्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर केजरीवाल यांनी उपोषण, आंदोलने आणि जाहीर सभा गाजवल्या. देश ढवळून काढणारे लोकपाल आंदोलन चालविले, त्याच ठिकाणी पुन्हा ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तेथे २८ डिसेंबर २०१३ रोजी केजरीवाल यांनी सार्वजनिक कार्यक्रमात शपथ घेतली होती.
एक साल बाद.... सीएम केजरीवाल राजीनाम्याचा योगायोग : १४ फेब्रुवारीला रामलीलावर शपथविधी
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल राजीनामा दिल्यानंतर ठीक एक वर्षानंतर म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. ४९ दिवस सत्तेवर राहिल्यानंतर गेल्यावर्षी १४ फेब्रुवारी रोजीच त्यांनी राजीनामा दिला होता. ज्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर केजरीवाल यांनी उपोषण, आंदोलने आणि जाहीर सभा गाजवल्या. देश ढवळून काढणारे लोकपाल आंदोलन चालविले, त्याच ठिकाणी पुन्हा ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तेथे २८ डिसेंबर २०१३ रोजी केजरीवाल यांनी सार्वजनिक कार्यक्रमात शपथ घेतली होती.दिल्लीतील अभूतपूर्व विजयानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असताना आपचे नेते आशुतोष यांनी अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर शपथ घेणार असल्याची घोषणा केली. २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत एक नवा पक्ष म्हणून समेार आलेल्या आम आदमी पार्टीने काँग्रेसला तिसऱ्या स्थानी ढकलत धक्कादायक विजय नोंदविला होता. विशेष म्हणजे केजरीवालांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक करणाऱ्या शीला दीक्षित यांचा २५,८६४ एवढ्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.